श्रीरामपुरात गावठी कट्टा व जिवंत काडतूस ताब्यात | पुढारी

श्रीरामपुरात गावठी कट्टा व जिवंत काडतूस ताब्यात

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपुरात गेल्या वर्षभरात तब्बल दीड डझनावर अवैध गावठी कट्टे पकडल्याचे उघड झाल्यानंतरही मालिका सुरुच आहे. नेवासा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोलपंप परिसरात गस्तीवरील पोलिस पथकाने एका तरुणास गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह जेरबंद केले.

दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. कॉ. गौरव राजेंद्र दुर्गुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुजामिल हरून हरुन बागवान याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास नेवासा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोलपंपाच्या परिसरात मुजामिल हरून बागवान (वय 29, रा. बिफ मार्केटजवळ, घरकुलामागे, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) यास गावठी कट्टा व एका काडतुसासह पकडले. कट्टा व काडतुसाची किंमत 55 हजार रुपये आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक संजय सानप, पो. ना. गोसावी, पो. कॉ. आचार, कातखडे, लगड, हरगुडे यांच्या पथकाने केली.

Back to top button