नगर : पाण्याच्या कारणावरून वृद्धाला मारहाण | पुढारी

नगर : पाण्याच्या कारणावरून वृद्धाला मारहाण

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील निर्मलनगर भागात भाड्याने राहणार्‍या एका वृद्धाला व त्यांच्या मुलाला व मुलाच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना दि. 14 जुलै रोजी घडली. याबाबत सुनील तात्याबा सांगळे (41, पाईपलाईन रोड, अहमदनगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विकास बन्सी बडे, बन्सी निवृत्ती बडे दोघे (रा. निर्मलनगर, अहमदनगर) व चार अनोळखी व्यक्ती अशा सहा जणाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुनील सांगळे हे दि. 14 जुलै रोजी निर्मलनगर येथे रहात असलेल्या वडिलांकडे जेवणाचा डबा घेऊन गेले होते.

रात्री सर्वजण घरी असताना फिर्यादी यांच्या वडिलांच्या घरमालकाचा मुलगा विकास बन्सी बडे व फिर्यादीचे वडील तात्याबा सांगळे यांचे पाण्याच्या कारणावरून भांडण झाले. त्यात फिर्यादीचे वडील यांना मारहाण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर विकास बडे याला माझ्या वडिलांना का मारले, असे विचारले असता शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून विकास बडे याने जबर दुखापत केली.

तसेच फिर्यादी यांच्या पत्नी भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही बन्सी बडे व इतर चार अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

Back to top button