नगर : अंगणवाडीचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा | पुढारी

नगर : अंगणवाडीचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा

टाकळी खातगाव : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील अंगणवाडीला शासनाने दिलेल्या आहार निकृष्ट दर्जाचा असून, हा आहार बदलून द्यावे, अशी मागणी सरपंच सुनील नरवडे यांनी केली आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत टाकळी खातगावमध्ये सहा अंगणवाड्या आहेत. या अंगणवाडीमध्ये 45 ते 50 बालके असून, या बालकांसाठी दोन महिन्याच्या आहार शिजवण्यासाठी आला आहे. हा आहार वाटपाचे काम गानाबंदर (मुंबई) येथील महाराष्ट्र स्ष्ट्रे को. ऑफ कज्युम फेडरेशन या ठेकेदार कंपनीला दिले आहे. त्यांच्यातर्फे प्रदीप घोडके या परिसरात आहार वाटपाचे काम करत आहेत. त्यांना सबंधित व्यक्तिने आहाराबाबत फोन केला असता, मी काय करू शकतो, असे उत्तर दिले.

सरपंच सुनील नरवडे यांनी ठाणगेवस्ती येथील अंगणवाडीमध्ये जाऊन या आहाराची चौकशी केली. यावेळी गव्हामध्ये सोनके, आळ्या आढळून आल्या. मुगाची डाळीलाही उग्र व ऊबट वास येतो, तांदळातही सोनकिडे आढळून आले. हरभर्‍यामध्ये खडे, ढेकळे दिसून आले. मिरची पावडर, हळद पावडर, तेल, मीठ साखर एक्साप्रायरी आहेत. असा आहार लहान बालकाला कसा द्या यचा? असा प्रश्न अंगणवाडी सेविका, वमदतनीसांनी विचारला आहे.

सरपंच सुनील नरवडे यांनी हा आहार शिजवण्यास विरोध केला असून, सबंधित अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली आहे. हा आहार बदलून मिळावा अशी मागीण केली असून, आहर शिजवण्यास त्यांनी परवानगी देण्यास नकार दिली आहे. हा आहार बदलून मिळाला नाही, तर ग्रामस्थांसह रस्तारोखो आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Back to top button