जवळा परिसरात अवैध धंदे जोरात, पोलिसांचं ‘सोयीस्कर’ दुर्लक्ष | पुढारी

जवळा परिसरात अवैध धंदे जोरात, पोलिसांचं 'सोयीस्कर' दुर्लक्ष

जवळा :  पुढारी वृत्तसेवा

जवळा (ता. पारनेर) परिसरात बेकायदा देशी विदेशी गावठी दारू, मटका, गुटखा जुगार राजरोसपणे सुरू आहेत पोलिस त्याकडे कानाडोळा करीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून उघडपणे अवैध धंदे करीत असताना गाव कारभारी त्यात सामील असल्याने सगळे कसे आलबेल चालू आहे.

नऊ देशांमधून वाहणार्‍या नदीवर नाही एकही पूल

गावातील तरुण व्यसनाधीन बनल्याने काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दिवसाबरोबरच रात्रीही टोळक्याने बसून गांजा ओढण्याचा, तसेच मद्यपान केले जात आहे. याला आवर घालण्यास पोलिस असमर्थ ठरले आहेत. गुन्हेगारीत अल्पवयीन मुले सामील झाल्याचे दिसून येत आहे. त्यात आता निघोजला संपूर्ण दारूबंदी झाल्याने व तेथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जवळ्यात अवैध धंदे वाल्याना आयते ग्राहक वाढले आहे.

वाढत्या तापमानामुळे घटली 44 तासांची झोप

त्यामुळे बेकायदा दारू विक्रेत्यांची चांगलीच चांदी होत आहे. रात्री-अपरात्री दारू पिउन धाब्यावर हाणामार्‍या, गोंधळ, हा नित्याचाच प्रकार झाला आहे. त्यामुळे गावची शांतता सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष घालून अवैध धंद्यांना आळा घालावास अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पंढरपूर : बंदी झुगारून चंद्रभागेत वाहनांचे सर्व्हिसिंग

जवळा मोठ्या लोकसंख्यचे व शेजारील पाच सहा गावांचे दैनंदिन बाजारपेठेचे मध्यवर्ती गाव आहे. पोलिस कारवाई करतात, पण नाट्यमय घडामोडीनंतर परत परिस्थिती’ जैसे थे’ होते. अवैध धंदे करणार्‍यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. जवळा परिसरातील अवैध धंद्यांना आळा न घातल्यास आंदोलनाचा पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला असून. पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अशा मागणीने आता चांगलाच जोर धरला आहे.

दरम्यान, परिसरातील गावांमध्येही अवैध धंदे जोरात सुरू असून, तेथील ग्रामस्थ त्याला वैतागले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे हे व्यावसायिक कोणालाच जुमानत नाहीत. या गावांमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Back to top button