नऊ देशांमधून वाहणार्‍या नदीवर नाही एकही पूल | पुढारी

नऊ देशांमधून वाहणार्‍या नदीवर नाही एकही पूल

नवी दिल्ली : जगातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी नदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेझॉन नदीची लांबी सुमारे 6 हजार 400 कि.मी. इतकी आहे. ही नदी नऊ देशांमधून वाहते. मात्र, आश्‍चर्य म्हणजे या नदीच्या संपूर्ण प्रवासात अद्याप एकही पूल बांधलेला नाही. खरेतर जगातील सर्वात लांब नदी म्हणून ‘नाईल’ला ओळखले जाते. मात्र, ताजे पाणी आणि पाण्याची एकूण मात्रा याचा विचार केला असता प्रामुख्याने ‘अमेझॉन’ नदीचेच नाव घेतले जाते.

ही नदी असंख्य जलीय जीवांचे घर बनली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्फिन्सही आढळतात. दक्षिण अमेरिका खंडातील सुमारे 40 टक्के भाग या नदीने व्यापला आहे. ही नदी ब्राझील, बोलिविया, पेरू, इक्‍वॅडोर, कोलंबिया, व्हेनेजुएला, गयाना, फ्रेंच गयाना आणि सूरीनाम या देशांमधून वाहते. असे असले तरी या नदीवर अद्याप एकही नदी नाही.

‘स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे स्ट्रक्‍चरल इंजिनिअरिंगचे चेअरमन वॉल्टर कोफमन यांनी सांगितले की, अमेझॉन अशा भागातून वाहते की तेथे पुलाची गरजच भासत नाही. ही नदी ज्या भागातून वाहते, तेथे लोकसंख्या जास्त नाही. याशिवाय जी शहरे या नदीच्या किनारी भागात वसली आहेत, ती मोठ्या प्रमाणात विकसित असून तेथे फेरी बोटींचा आधार घेतला जातो. याशिवाय अमेझॉन नदी किनारी केवळ नरम मातीच आहे. यामुळे तेथे पूल उभारणे ही एक आव्हानात्मक आणि अत्यंत खर्चिक बाब आहे, यामुळेच या नदीवर अद्याप एकही पूल बांधण्यात आलेला नाही.

Back to top button