Sheetal Mhatre Vs Priyanka Chaturvedi | दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंत? म्हात्रेंच्या प्रश्नाला चतुर्वेदींचे प्रत्युत्तर | पुढारी

Sheetal Mhatre Vs Priyanka Chaturvedi | दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंत? म्हात्रेंच्या प्रश्नाला चतुर्वेदींचे प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क: ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांच्याकडून चतुर्वेदी यांच्यावर दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंत? यावर आम्हाला तोंड उघडलायला लावू नका असे म्हटले होते. त्यांच्या या प्रश्नाला प्रियंका चतुर्वेदी यांनी “मी कधीच दावोसला गेलो नाही! पण मी एक दिवस नक्कीच जाईन” असे प्रत्त्युत्तर दिले आहे. (Sheetal Mhatre Vs Priyanka Chaturvedi)

प्रियंका चतुर्वेदी शिंदे पितापुत्रांवर टीका करताना नेमकं काय म्हणाल्या?

महाविकास आघाडीचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारसभेत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे पिता-पुत्रावर टीकास्त्र सोडले. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या की, “कोण एकनाथ शिंदे? कोण आहेस तू?” म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. यावेळी समोर जमलेल्या लोकांकडून “गद्दार, गद्दार” असा प्रतिसाद त्यांना मिळत होता. पुढे त्या “ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार”, असेदेखील टीका करताना म्हणाल्या. (Sheetal Mhatre Vs Priyanka Chaturvedi)

‘मेरा बाप गद्दार आहे’- प्रियंका चतुर्वेदींकडून शिंदे पितापुत्रांना लक्ष्य

पुढे प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘दिवार’ सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या “मेरा बाप चोर हैं |” या डायलॉगची आठवण करून देत, खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील त्यांच्या कपाळावर ” मेरा बाप गद्दार आहे”, असे लिहिले पाहिजे अशी टीका केली. यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि भाजपच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना लक्ष्य केले. शितल म्हात्रेंनी देखील प्रियंका यांच्यावर खोचक टीका केली. (Sheetal Mhatre Vs Priyanka Chaturvedi)

दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलत?- म्हात्रेंचा चतुर्वेदींना सवाल

यावेळी शितले म्हात्रे यांनी एक्स पोस्टमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांना म्हटले आहे की, “खासदारकीची टर्म संपल्यावरची, चतुरताईंची तडफड आता दिसू लागलीय. दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलत??? आणि मागच्या आठवड्यात परत खासदारही मिळवायला कुणा कुणाकडे लोटांगणं घातली ते सांगायला लावू नका” अशी टीकादेखील म्हात्रे यांनी केली.

‘ये पब्लिक हे ताई… तुमसे भी ‘चतूर’ है ‘-शितल म्हात्रेंची टीका

चतुर ताई, पक्षात घेण्यासाठी २ महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे हाता पाया पडत होत्या. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या उमेदवारीचे स्वप्न तुमचं डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण होऊ दिलं नाही. त्यामुळे पिसाळलेल्या नागिणीप्रमाणे त्यांच्यावर आता आरोप करताय. ठाकरेंचे कोविड घोटाळ्याचे कागदपत्र घेऊन तुम्हीच साहेबांकडे आला होतात ना? आता स्वतःचे पितळ उघडं पडू नये म्हणून हा खेळ…??? ये पब्लिक हे ताई… तुमसे भी ‘चतुर’ है …!!!, असेदेखील शितले म्हात्रे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘गद्दार सेनेची मंदबुद्धी महिला’- प्रियंका चतुर्वेदींची टीका

शिवसेना शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांना प्रत्त्युत्तर देताना प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, मी कधीच दावोसला गेली नाही! पण मी एक दिवस नक्कीच जाईन. गद्दार सेनेच्या या मंदबुद्धी महिलेने हे सिद्ध केले आहे की त्या फक्त गद्दार नाहीत तर खोट्या आहेत. आता पुन्हा रडायला जा, तुझे अश्रू पुसण्यासाठी टिश्यू नाहीत.

Back to top button