जळगाव : मुख्यालयातील निवडणुकीचे काम शंभर टक्के पूर्ण – जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद | पुढारी

जळगाव : मुख्यालयातील निवडणुकीचे काम शंभर टक्के पूर्ण - जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
निवडणुकीचे काम शंभर टक्के काम पूर्ण झाले असून मतदान नंतर ईव्हीएम बॅलेट युनिट ठेवण्यासाठी काम पूर्णत्वास आले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सर्वात कमी वोटिंग ही जळगाव सिटी नेरूळ मध्ये 19 टक्के झाली तर पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथे शून्य टक्के झाली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 725 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे व या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाच्या बूथपासून तर प्रत्येक तालुक्याच्या बूथवर जाऊन व्हिजिट देण्यात आलेली आहे. फक्त एकमेव बोदवड तालुका सोडल्यास उमरडी ज्या ठिकाणी गावठी पिस्तुले होतात. या गावात देखील  जिल्हाधिकारी यांनी भेट दिलेली आहे. तसेच झेडपी शाळेमधून 2100 किलो कचरासंकलन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मतदानासाठी स्वच्छता करण्यात आलेली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील 584 मतदान बूथ व रावेर मतदार संघातील 513 मतदार या ठिकाणी ओळखपत्र व इतर कागदांची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील 480 किलोमीटरचा रूटवर 805 वाहने तर रावेर मतदार संघातील 594 रूटवर 901 वाहने राहणार आहे व यातून मतदार यंत्रणा व अधिकारी कर्मचाऱ्यांना पोहोच करण्यात येणार आहे.

Back to top button