काळजी घ्या! पुण्याचा पारा चाळीशी पार; राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा | पुढारी

काळजी घ्या! पुण्याचा पारा चाळीशी पार; राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा

पुणे : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून, त्याचा मुक्काम सोमवारपर्यंत (22 एप्रिल) वाढला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस कोसळत असला, तरी दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा शिगेला पोहोचला असून, गुरुवारी (दि.18) राज्यात मालेगाव आणि पुणे शहराच्या कमाल तापमानाचा पारा 43.5 अंशसेल्सिअस इतका नोंदवला. हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान ठरले.
गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात वादळी वार्‍यासह गारपीट झाली, तर मराठवाडा व विदर्भात हलका पाऊस बरसला. कोकणात 20 एप्रिल, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात 22 एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला
आहे.

राज्याचे गुरुवारचे कमाल तापमान (अंशसेल्सिअसमध्ये)

जळगाव- 42.6, कोल्हापूर- 36.7, मुंबई- 34, नाशिक- 40.6, सातारा- 40.1, सोलापूर- 42.6, परभणी- 41.7, अकोला- 42.1.

हेही वाचा

Back to top button