इस्रायलबराेबरील कराराला विरोध : गुगलने केली २८ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी | पुढारी

इस्रायलबराेबरील कराराला विरोध : गुगलने केली २८ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायलशी केलेल्या कराराला विरोध केल्‍या प्रकरणी गुगल कंपनीने आपल्‍या २८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अशा वर्तनासाठी कंपनीत कोणतेही स्थान नाही ते सहन केले जाणार करणार नाही, असेही स्‍पष्‍ट केले आहे.

‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार गुगलने प्रोजेक्ट निंबस नावाच्या इस्रायलसोबतच्या क्लाउड-कॉम्प्युटिंग करार केला आहे. याविरोधात गुगलच्या दोन कार्यालयात कर्मचाऱ्यांनी नुकतेच धरणे आंदोलन केले होते. मंगळवारी, काही कर्मचाऱ्यांनी गुगलच्या क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांच्या कार्यालयातून आठ तासांपेक्षा जास्त काळ हलण्यास नकार दिला. त्यांना अटकही करण्यात आली. या प्रकरणी गुगलने स्‍पष्‍ट केले आहे की, अशा वर्तनासाठी कंपनीत कोणतेही स्थान नाही ते सहन केले जाणार करणार नाही.

अशा वर्तणुकीला कंपनीत स्थान नाही

गुगलने स्‍पष्‍ट केले आहे की, प्रोजेक्ट निंबस नावाच्या इस्रायलसोबतच्या क्लाउड-कॉम्प्युटिंग कराराविरोधात काही कर्मचाऱ्यांनी न्यू यॉर्क आणि सनीवेल येथील टेक जायंटच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले. त्यांनी ऑफिसच्या जागा ताब्यात घेतल्या, आमच्या मालमत्तेची विटंबना केली. तसेच इतर कर्मचार्‍यांच्‍या कामातही अडथळा आणला. तपासानंतर आम्ही २८ कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. या प्रकरणाची आम्ही यापुढेही चौकशी करणार आहोत. अशा वर्तणुकीला आमच्या कंपनीत कोणतेही स्थान नाही.

आमचे बहुसंख्य कर्मचारी योग्य प्रकारे काम करतात. मात्र काहींना वाटतं आम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या वर्तनाकडे दुर्लक्ष करणार आहोत. तर त्‍यांनी पुन्हा विचार करावा. कंपनी हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला आहे, असेही कंपनीने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button