Weather Update : राज्यातील तापमानात वाढ; ‘हा’ भाग असेल अधिक उष्ण | पुढारी

Weather Update : राज्यातील तापमानात वाढ; 'हा' भाग असेल अधिक उष्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस अन् गारपिट झाल्याने कमाल तापमानाचा पारा किंचित कमी झाला. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मालेगावचा पारा 39 अंशांवर गेला होता.
गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर होता. घोंघावणारा वारा अन् गारपिटीने काही भागांत पाऊस झाला. मात्र, मध्य, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांत हवामान कोरडे अन् उष्ण होते. मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान होते.

मंगळवारचे कमाल-किमान तापमान

मालेगाव 39 (19.8), पुणे 35.4 ( 19.1), अहमदनगर 35 (16.3), जळगाव 35.7 (18.6), कोल्हापूर 35.6 (21.3), महाबळेश्वर 29.5 (17.1), नाशिक 34 (17.6), सांगली 36.3 (19.3), सातारा 35.5 ( 19), सोलापूर 39 (22.6), छत्रपती संभाजीनगर 35.2 (20.2).

नागपूरसह पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

नागपूर, वर्धा, गोंदियासह पूर्व विदर्भातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. विविध जिल्ह्यात हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट दिला होता. त्या अंदाजानुसार आज सकाळी चांगले ऊन असताना दुपारी चारच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शहरात तारांबळ उडाली.पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button