शासनाद्वारे प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टीकचा हा साठा जवाहर गेट येथील विनोद ट्रेडर्स दुकान क्र.२ येथे असल्याची गुप्त माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारावर संबंधित ठिकाणी धाड टाकून ही जप्तीची कारवाई करण्यात आली. संबंधित दुकान सील करण्यात आले असून दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही प्लास्टिक जप्तीची कारवाई महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पी.एम. मेहरे, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे यांनी केली.