आरटीई प्रवेशांसाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत तेरा हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित | पुढारी

आरटीई प्रवेशांसाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत तेरा हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पालकांना ८ मेपर्यंत प्रवेश घेता येणार असून, आतापर्यंत तेरा हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ६४ हजार ४१३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीमध्ये ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेशासाठी १३ एप्रिलपासून २५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या परिपत्रकानुसार ऑनलाइन सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. आता ८ मेपर्यंत पालकांना त्यांच्या मुलांचे प्रवेश करता येणार आहेत.

Back to top button