घरातील पाळीव सदस्य होतोय महाग | पुढारी

घरातील पाळीव सदस्य होतोय महाग

पिंपरी : आपल्या जवळ एकतरी पाळीव प्राणी असावा, अशी हौस प्रत्येकाला असते. परंतु, आता ही हौस महागडी ठरत आहे. यामुळे पाळीव प्राणी सांभाळणार्‍या वसतिगृहांवर ताण वाढला असल्यामुळे पाळीव प्राणी पाळणे आता महाग झाले आहे.

सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाळीव प्राण्यांचे अन्नदेखील महागले असून, 10 ते 15 टक्य्यांनी यात वाढ झाली आहे. त्यात प्रत्येक ऋतू प्रमाणे पाळीव प्राण्यांचे खाणे-पिणे बदलत असून लसीकरण, औषध यांचे खर्च वाढले आहेत.

घरात एकटी व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती घरात पाळीव प्राणी ठेवतात. त्यावर भरपूर खर्चदेखील करतात. परंतु, सध्या महागाई सर्वच स्तरातून वाढत असल्याने प्राण्यांच्या खाण्याचे विविध पदार्थ, लसी तसेच दवाखानादेखील महागले आहेत. प्राण्यांना कुटुंबाचा लळा लवकर लागतो. त्यामुळे हे प्राणी बाहेर वावरताना स्वतःला सुरक्षित समाजत नाहीत. त्यामुळे त्यांना सवय होईपर्यंत शहरात पिंपळे निलख भागात वसतिगृह उपलब्ध आहे. पुणे शहरातदेखील प्रत्येक उपनगर भागात असे वसतीगृह सुरू झाले आहेत. सध्या या वसतीगृहांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे.

वाढत्या खर्चामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या खिशाला कात्री लागत असून प्राण्यांचा दवाखाना दहा टक्क्यांनवी महाग झाला आहे. पशु औषधेदेखील महाग झाली आहेत.

पाळीव प्राण्यांचा खर्च

लसीकरण 6 हजार ते 10 हजार सहा महिन्यांतून एकदा
ऋतूप्रमाणे आजार व दवाखाना 3 हजार ते 5 हजार
खाणे, अन्नपदार्थ 10 हजार महिना
सप्लिमेंट 5 हजार महिना

कोरोना महामारी काळात प्राण्यांना खूप जपावे लागले आहे. खर्चामध्ये वाढ होत असल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी पाळीव प्राण्यांना जवळ न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या औषधांवरील आयात वाढल्याने त्याचा परिणाम वैद्यकीय सेवांवर झाला आहे.
– डॉ. अलोक सारंगे, पशुतज्ज्ञ

Back to top button