माळशिरस आरोग्य विभागाची जय्यत तयारी | पुढारी

माळशिरस आरोग्य विभागाची जय्यत तयारी

माळशिरस : अनंत दोशी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोमवार दि. 4 जुलै रोजी तर संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवार दि. 5 जुलै रोजी माळशिरस तालुक्यात येत आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी पंचायत समितीचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्ष पालखी सोहळा झाला नाही. त्यामुळे यंदा पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने पंचायत समिती च्या आरोग्य विभागाणे जय्यत तयारी केली असल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहीते यांनी दिली. माळशिरस तालुक्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हा 55 कि. मी. चा तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 25 कि. मी. चा पालखी मार्ग आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नातेपुते, माळशिरस व वेळापूर येथे मुक्काम तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अकलुज व बोरगांव येथे मुक्काम आहेत.

माळशिरस तालुक्यात अकलुज येथे उप जिल्हा रुग्णालय व माळशिरस व नातेपुते येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. एकुण प्राथमिक आरोग्य केंद्र 12 आहेत. पालखी सोहळ्यासाठी आरोग्य सल्ला व उपचार केंद्र 34, रुग्णवाहीका 16, 108 रुग्नवाहीका प्रत्येक मुक्कामी 4, पाणी स्त्रोताची संख्या 754, पाणी टँकर भरण्याची ठिकाणे 43, टी. सी. एल. बॅग 570 वैद्यकीय अधिकारी, 17 वैधकीय अधिकारी, प्रतिनियुक्तीवर 10 आरोग्य सहाय्यक, 13 आरोग्य सहाय्यक, प्रतिनियुक्तीवर 10 आरोग्य सेवक, 48 आरोग्य सेवक, प्रतिनियुक्तीवर 120, वॉकी टॉर्की सेट 6, एकुण कर्मचारी 7 98, आरोग्य दुत 25 असे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत उपचारात्म सुविधा देण्यात येणार आहेत. त्यात प्रत्येक 2 किमीवर आरोग्य सल्ला व उपचार केद्राची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच डॉक्टर्स व आरोग्य संख्या यांचे मोबाईल नंबर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

दोन्ही पालखी सोहळ्यात रुग्णवाहीका सुवीधा पुरवणेत येणार असुन खाजगी रुग्णालय व रक्तपेढी यांना मदतीचे अवाहन करण्यात आले आहे. तसेच खाजगी आय. सी. यु. मध्ये बेड राखीव ठेवणेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पंचायत समितीच्या आरोग्य विभागा मार्फत महीलासाठी विषेश स्तनपान पक्ष कोवीड 19 टेस्टींग व लसीकरण कक्ष कोवीड 19 विलगीकरणासाठी 175 बेड असलेले 6 विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे 3, तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे2 मुक्काम तालुक्यात आहेत. यासाठी पंचायत समितीचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सोहाळ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
– डॉ. रामचंद्र मोहिते
तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस

Back to top button