गडचिरोलीत महायुतीसाठीच काम करणार; धर्मरावबाबांचे घुमजाव | पुढारी

गडचिरोलीत महायुतीसाठीच काम करणार; धर्मरावबाबांचे घुमजाव

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  गडचिरोली जागा लढण्याबाबत सतत आग्रही असलेले, भाजपची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आता घुमजाव केले आहे. पक्षाने आदेश दिला तरच लढणार, अन्यथा महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. ते आज (दि.२३) विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

गडचिरोलीचे तिकीट अद्याप जाहीर झालेले नाही, त्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आज (दि. २३) दिल्लीत महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक आहे. जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील त्याला निवडून आणण्याचे काम माझ्या वतीने केले जाईल, असे आत्राम यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ लोक बोलल्यानंतर मी त्यामध्ये काय बोलणार, सध्या सगळे वरिष्ठ बसले आहेत. जो काही निर्णय होईल, त्या निर्णयाप्रमाणे जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्याचे काम आपण करू, जे जे उभे राहणारे अपेक्षित उमेदवार आहेत, त्या सगळ्यांनी ठरवलं आहे. माझे सुद्धा कागदपत्र तयार आहेत, जर पक्षाचा आदेश आला, तर मी उमेदवारी अर्ज भरेल.

दरम्यान,उदयनराजे भोसले यांच्या सातारा जागेविषयी बोलताना ते तिकडचे राजे आहेत, इकडचा राजा मी आहे, असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button