पैठण तालुक्यात जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

पैठण तालुक्यात जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

Published on

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे खरीब हंगाम धोक्यात आलाय. पैठण तालुक्यात संततधारमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे येथील धरणामध्ये ८५.०४ पाणीसाठा झाला आहे. छोट्या-मोठ्या धरणातून मंगळवारी रोजी सकाळी १७ हजार ४८१ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.

सोमवारी रात्रीपासूनच तालुक्यातील विहामांडवा ३४, लोहगाव १८,पाचोड १८, आडूळ १९, नांदर २४, बालानगर २२, ढोरकीन ३९ , बिडकीन १८, पिंपळवाडी पिं २१, पैठण ३२ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस विहामांडवा येथे १०८० मि.मी एवढा झाला आहे. आतापर्यंत तालुक्‍यात एकूण ८३९१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सोयाबीन, उडीद, बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले आहे.

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारा कापूस मोठे नुकसान झाले आहे.

शेतामध्ये गुडघ्या एवढे पाणी झाले आहे. त्यामुळे शेती शिवारात तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

तालुका प्रशासनाने तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी. यासाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शिवना टाकळी परिसरातील ९ गावांचा वीजपुरवठा खंडित

शिवना टाकळी प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले आसल्याने नदीची पाणी पातळी धोकादायक वाढलीय. त्यामुळे नदीकाठी असणारे ३३ के व्ही टाकळी फिडरचे काही लोखंडी पोल पाण्यात गेले आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव पाणीपातळी कमी होईपर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे.

तरी सध्या संपूर्ण टाकळी उपकेंद्र बंद ठेवण्यात आलेले आहे.

टाकळी, वैसपूर, अंतापूर, औरंगपूर, आलापूर, केसापूर, बोरसर खुर्द, बोरसर बुदुर्क, लव्हाळी या नऊ गावांची वीड बंद आहे. अशी माहिती महावितरण अभियंता केदारे यांनी दिली आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news