Yavatmal : बस नाल्यात कोसळली; दोघांचा मृत्यू तर प्रवाशी बेपत्ता | पुढारी

Yavatmal : बस नाल्यात कोसळली; दोघांचा मृत्यू तर प्रवाशी बेपत्ता

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : पुसद-उमरखेड (Yavatmal) रस्त्यावरील दहागाव पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नाल्यात कोसळली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून बस चालकासह काही प्रवासी बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

मागील दोन दिवसांपासून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच मंगळवारी सकाळी नागपूर आगाराची एमएच १४ बी.टी.५०१८ या क्रमांकाची बस उमरखेड येथून काही प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती.

या मार्गावर दहेगाव नाला असून त्यावर मोठा पूल आहे. दोन दिवसांपासून या पुलावरून पाणी वाहत आहे. असे असताना बस चालकाने नाल्यावरून बस काढण्याचा प्रयत्न केला. परिसरात असलेल्या नागरिकांनी बसला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने दुर्लक्ष केले.

दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट नाल्यात कोसळली. या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू तर चालकासह काही प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती मिळली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच उमरखेड तहसीलदार, ठाणेदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने मदत कार्य सुरू केले. दोन जण झाडावर तर दोन जण एसटीबसच्या टपावर आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पहा व्हिडीओ : Yavatmal : बस नाल्यात कोसळली; दोघांचा मृत्यू तर प्रवाशी बेपत्ता

Back to top button