‘पुढारी’च्या वर्धापनदिनाला मोदी यांच्या शुभेच्छा डिजिटल लाईफ स्टाईल खास पुरवणीची प्रशंसा | पुढारी

‘पुढारी’च्या वर्धापनदिनाला मोदी यांच्या शुभेच्छा डिजिटल लाईफ स्टाईल खास पुरवणीची प्रशंसा

‘पुढारी’च्या त्र्याऐंशीव्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी खास पत्र पाठवून ‘पुढारी’ला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘डिजिटल लाईफ स्टाईल’ या खास पुरवणीचीही मनःपूर्वक प्रशंसा केली आहे. ‘डिजिटल इंडिया’ हा नव्या भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा बुलंद नारा आहे. विकासाच्या दिशेमध्ये डिजिटल प्रणालीची भूमिका निर्णायक आहे. राष्ट्रहिताच्या अशा संकल्पनांना सामर्थ्य प्राप्त करून देण्यात ‘पुढारी’चे मोलाचे योगदान आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे मूळ पत्र येथे दिले आहे.

Back to top button