नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के | पुढारी

नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारपासून सलग तिसऱ्या दिवशी नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा त्याच सुमारास दुपारी 2.28 मिनिट 04 सेकंदांनी सौम्य भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 2.7 मॅग्नेट्यूड अशी तीन दिवसात सर्वाधिक असून नागपूर जिल्ह्यातील कुही हेच आजही केंद्रस्थान असल्याची नोंद भूकंप मापन कार्यालयाने दिली आहे.

शुक्रवारी 2.5 मॅग्नेट्यूड तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाबतीत अतिशय सुरक्षित मानल्या जात असलेल्या नागपूरला एकाच महिन्यात भूकंपाचे हे चौथ्यांदा धक्के बसले आहेत. शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची मॅग्नेट्यूड खोली 2.4 क्षेत्रफळ पाच किलोमीटर तर लॅटिट्युड लोंगेस्ट 21.2 आणि 79.32 अशी नोंद झाली आहे. आज पुन्हा रविवारी (दि.5) त्याचवेळेस नागपूर परिसरात भूकंप झाल्याची नोंद झाली 20.84 तर लॉंग 79.15 असून हा या परिसरात सतत खनिज उत्खनन सुरू असल्याने ब्लास्टिंगचा प्रकार असावा अशी शक्यता आहे, प्रशासनाने चौकशी करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.

Back to top button