Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, २ मे २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, २ मे २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज कामाच्‍या व्‍यापातून कुटुंबासाठी वेळ काढाल. घराच्या देखभालीशी संबंधित काही कामे होतील. तुमच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या योजना सुरू करा. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. अन्‍यथा त्यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. न्यूनगंडाची भावना देखील राहू शकते. एखाद्याशी संवाद साधताना योग्य शब्द वापरा. कामाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे पेपर वर्क किंवा ऑर्डर पूर्ण करताना योग्य परिश्रम घ्या, अशी सूचना श्रीगणेश करतात.

वृषभ : खूप दिवसांनी घरात पाहुणे आल्याने आनंदी वातावरण असेल. मुलाच्या कोणत्याही सकारात्मक क्रियाकलापांमुळे तुम्हाला दिलासा मिळेल. मात्र नातेवाईकांशी संबंध खराब होऊ शकतात. नकारात्मक कामात असलेल्या लोकांशी संगत करणे नुकसानकारक ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी संबंध खराब होऊ देऊ नका. व्यावसायिक बाबींचा तुमच्या कुटुंबावर परिणाम होऊ देऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. पोटविकारामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल.

मिथुन : कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्य प्रकारे पार पाडू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. अचानक नकारात्‍मक घटना घडल्‍याने गोंधळ होऊ शकतो. याचा तुमच्यावर परिणाम होऊ देवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळा. वैवाहिक नात्यात गोडवा येऊ शकतो.

कर्क : वैयक्तिक कामे आज यशस्वीपणे पूर्ण होतील. ग्रहमान अनुकूल आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्यही मिळेल. एखाद्यावर पटकन विश्‍वास ठेवू नका. कोणत्याही सामाजिक कामांमध्ये बोलताना जपून संवाद साधा. कुटुंबासोबत वेळ व्‍यतित केल्‍याने पुन्हा उत्साही वाटेल. आरोग्य चांगले राहू शकते.

सिंह : काही नवीन गोष्टी शिकण्यात आजचा वेळ व्‍यक्‍तित करा. अपेक्षित यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. खर्च जास्त होईल. त्‍याबरोबरच उत्पन्नाचे साधन वाढेल. कोणतीही अडचण येणार नाही. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा. मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतात; नकारात्मक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कार्यक्षेत्रात लाभ होण्याऐवजी मेहनत जास्त होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.

कन्या: कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात तुमच्या विचारांना विशेष महत्त्व दिले जाईल, असे श्रीगणेश सांगतात. संवाद वाढेल आणि हा संपर्क तुमच्यासाठीही फायदेशीर ठरेल.मात्र अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत.

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, न्यायालया संदर्भात कामकाज सुरु असले तर आज निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. दूरचे नातेवाईक आणि मित्र यांच्याशीही संबंध प्रस्थापित होऊ शकतात. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका; कोणालाही अनावश्यक सल्ला देऊ नका. कार्यक्षेत्रात प्रत्येक काम गांभीर्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. पोटाविकारामुळे त्रास होईल.

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आजच्या दिवशी नियमित कामांव्यतिरिक्त काही वेळ आत्मपरीक्षणात व्‍यतित करा. यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न सोडवता येतील. घराच्या अंतर्गत बदलांशी संबंधित काही योजना असतील तर त्याचा विचार करा. इतरांना जास्त शिस्त लावू नका. रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारच्या भागीदारीचे नियोजन टाळा. पती-पत्नीमध्ये अहंकाराशी संबंधित वाद निर्माण होऊ शकतात. तब्‍येतीकडे दुर्लक्ष करु नका.

धनु : काही काळापासून सुरू असलेली मेहनतीचा आज फायदा होईल. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, अशी सूचना श्रीगणेश करतात. काही अज्ञात विषयांमध्ये तुमची आवडही जागृत होईल. सार्वजनिक व्यवहार आणि मीडियाशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या. पती-पत्नीमधील भावनिक नाते दृढ होईल.

मकर : श्रीगणेश म्हणतात की, आपण नातेवाईकांना पूर्ण सहकार्य कराल. तुमच्या नम्र स्वभावामुळे घरात आणि समाजात तुमची प्रशंसा होईल. शेजाऱ्यांसोबतचा जुना वादही मिटवला जावू शकतो. बऱ्याच वेळा तुम्ही काल्पनिक योजना बनवता, ज्यामुळे तुमची कृती खराब होऊ शकते. त्यामुळे वस्तुस्थितीला सामोरे जा. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका. बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, काही जवळच्या लोकांच्या भेटीमुळे लाभ होईल. सामाजिक स्तरावर नवीन ओळख देखील मिळू शकते. मुलांचे प्रश्न सोडविण्‍यास प्राधान्‍य द्‍या. तुमच्या यशाची खूप प्रशंसा करू नका. तुमच्या कुटुंबाप्रती तुमचे समर्पण घरामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राखेल. सांधेदुखीचा त्रास असेल तर तो वाढू शकतो.

मीन : दिवसाची सुरुवात धावपळीने होईल. घरात विशेष पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्ही व्यस्त राहू शकता, असे श्रीगणेश सांगतात. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन कामातून थोडा वेळ आराम आणि मौजमजेसाठी घालवाल. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ देऊ नका. आरोग्य चांगले राहिल.

Back to top button