Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार २४ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार २४ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष: आज नातेवाईकांसह मित्रांबरोबर झालेली भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मन प्रसन्न राहील. मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे योगदान आवश्यक आहे, असे श्रीगणेश सांगतात. राग आणि घाई टाळा. घर-कौटुंबिक आणि व्यवसायाशी संबंधित कामे व्यवस्थित ठेवा. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बहुतांश वेळ लाभदायक ठरणार नाही.
वृषभ: श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. उत्पन्न आणि खर्चात समानता राहील. आत्मचिंतनातही थोडा वेळ व्‍यतित केल्‍यास अनेक अडचणींवर मात करण्‍यास मदत होईल. किरकोळ निष्काळजीपणामुळे भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यावहारिक कौशल्यातून प्रत्येक समस्येवर उपाय शोधा. इतरांना जास्त शिस्त
लावण्‍यासाठी आग्रही राहू नका. व्यावसायिक कामे सुरळीतपणे सुरु राहतील.
मिथुन : आज आपल्‍या कार्यावर लक्ष केंद्रीत करा. मागील काही काळापासून सुरू असलेल्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा तुम्हाला फायदा होणार आहे, असे श्रीगणेश सांगतात. जमिनीशी संबंधित प्रकरणाच्‍या व्‍यवहारात विलंबाची
शक्‍यता. महत्वाच्या गोष्टींची स्वतः काळजी घ्या, इतरांवरील अतिविश्वास हानीकारक ठरेल, अशी सूचना श्रीगणेश करतात.
कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज पूर्ण शक्तीने तुमच्या कार्यात समर्पित व्हा. शेजाऱ्यांसोबत सुरु असलेल्‍या वादावर पडदा पडू शकतो. यामुळे तुमच्या नात्यात गोडवा येईल. मुलांच्या समस्येवर उपाय सापडेल. तुमच्या निरागस स्वभावामुळे लोक गैरफायदा घेत आहेत असे वाटेल.सध्याच्या व्यवसाय पद्धतीत काही बदल आवश्यक आहेत. पती-पत्नीचे नाते मधुर राहील.
सिंह : आज निकटवर्तींबरोबर सुसंवाद साधाल. घरगुती कामांसह मुलांच्या समस्या सोडविण्‍यात व्‍यस्‍त राहाल. तुमच्या यशाचा गवगवा करू नका. शांतपणे कामांवर लक्ष केंद्रित करा. व्यवसायाच्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण करू शकतो. जोडीदाराशी संबंध मधुर होतील.
कन्या : आज दिवसाची सुरुवात धावपळीने होईल. घरात विशेष पाहुण्यांच्या आगमनाने तुम्ही व्यस्त राहू शकता. वर्तन सुधारण्यासाठी तुम्ही काही विशेष नियम कराल, असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते. विरोधक तुमच्याविरुद्ध काही आक्षेपार्ह स्थिती निर्माण करू शकतो.
तूळ : आज दिवसभर कार्यात व्‍यस्‍त राहाल.आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ व्‍यतित केल्‍यास नवीन उर्जेचा अनुभव मिळेल. एखाद्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा चुकीचा सल्ला त्रासदायक ठरु शकतो. तुम्‍ही स्वतःच्‍या निर्णयावर ठाम राहा. भावांसोबत जमिनीचा वाद असेल तर तो शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यावसायिक कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. कौटुंबिक वातावरण खूप सकारात्मक ठेवता येईल.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज घाईगडबड टाळून शांतपणे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जवळच्या लोकांशी झालेली भेट सकारात्‍मक ठरेल. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. कोणत्याही कामात घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. आर्थिक व्‍यवहार अत्यंत सावधगिरीने पूर्ण करा.
धनु : आध्यात्मिक विश्वास वाढल्याने तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवाल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करून घ्या. घरातील मोठ्या व्यक्तींचा अनादर करू नका. त्याचे आशीर्वाद तुमच्यासाठी खूप आनंददायी ठरतील, असे श्रीगणेश सांगता. आज मार्केटिंगशी संबंधित कामे टाळणे चांगले. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
मकर : तुम्‍हाला तुमच्या कामात केलेल्या मेहनतीनुसार आज योग्य फळ मिळेल. मित्राबरोबर मतभेदाची शक्‍यता. त्यामुळे नात्यातही दुरावा निर्माण होवू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणुकीच्या प्रत्येक स्तरावर योग्य चर्चा करा. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित काही योजना कामी येऊ शकतात. काम जास्त असले तरी घर आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकाल.
कुंभ : श्रीगणेश सांगतात की, आज एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना सुरू होऊ शकते. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. मुलांचे कोणतेही यश तुम्हाला आनंद देऊ शकते. कौटुंबिक सदस्यांसह खरेदीमध्ये आनंदी वेळ जाईल. इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे घरगुती वातावरण तणावपूर्ण राहण्‍याची शक्‍यता. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. स्‍वत:च्‍या निर्णयावर ठाम राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात काही बदल घडवून आणण्याची गरज आहे.
मीन : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर घरातील ज्‍येष्‍ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अहंकार स्वभावात येऊ देऊ नका. अन्यथा, यामुळे तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ शकता. व्यावसायिक स्तरावरही सर्व कामे सुरळीत पार पडतील.

Back to top button