Ram Navami 2024 : रामनवमीसाठी शहर सजले, रामजन्मोत्सव सोहळा पार पाडण्यासाठी भक्तांमध्ये उत्साह | पुढारी

Ram Navami 2024 : रामनवमीसाठी शहर सजले, रामजन्मोत्सव सोहळा पार पाडण्यासाठी भक्तांमध्ये उत्साह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रामनवमीसाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोदाघाटावरील अतिप्राचीन गोरेराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.

नाशिक : श्रीरामनवमीसाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली असून, यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला दर्शनासाठीदेखील भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. (छाया : हेमंत घोरपडे)

रामनवमीचा उत्सव बुधवारी (दि.१७) साजरा करण्यात येणार आहे. सर्वत्र आनंद आणि चैतन्याचे वातावरण आहे. या उत्सवासाठी शहरातील राममंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे. तसेच गाभारा विविध फुलांनी सजावला आहे. गोदाघाटावरील गोरेराम मंदिरात राम, लक्ष्मण, सीता व भरत तसेच शत्रुघ्न यांच्या सुबक मूर्तींना आकर्षक सजावट केली गेली आहे. मंदिरात सकाळी १० ते १२ यावेळेत प्रसाद जोशी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिराचे विश्वस्त हेमंत पद्मनाभी यांनी केले आहे. तसेच पंचवटीत मुठे यांचे राममंदिर, रविवार कारंजा येथील श्री गोरेराम मंदिर, भोसला मिलिटरी स्कूल परिसरातील कोदंडधारी राममंदिरासह शहरातील अन्य राम मंदिरांमध्येदेखील रामनवमी उत्सवासाठी सज्ज झाले आहेत. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button