मुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, ‘रोकड पक्षाचे अध्यक्ष…’ | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, 'रोकड पक्षाचे अध्यक्ष...'

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोविडच्या काळात ते स्वतः घरात बसून होते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेकड किंवा भाकड बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. उलट ते स्वतः त्या काळात रोकड गोळा करण्यात गुंतले होते, किंबहुना त्यांना रोकड पक्षाचे अध्यक्ष म्हणायचे का, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. चंद्रपूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष्य केले. आज उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली.

उद्या 10 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक मतदारसंघात सभा होत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज रात्री नागपुरात आले. रात्री उशिरा नागपुरात आल्यानंतर माध्यमांशी विमानतळावर ते बोलत होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महायुती, एनडीएला पाठिंबा दिला. या निर्णयाबद्दल त्यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणूक आटोपल्यावर  विधानसभा निवडणूकीचे बघू असे संकेत त्यांनी दिले. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन केले या संदर्भात एका प्रश्नाचे उत्तरात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम असल्यामुळे त्यांनी अधिकाधिक  सभा राज्यात दिल्या आहेत असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर स्पष्ट केले.

Back to top button