मी निवडून आलो तर तरुणांची लग्ने लावणार; असेही अजब आश्वासन | पुढारी

मी निवडून आलो तर तरुणांची लग्ने लावणार; असेही अजब आश्वासन

लोकसभा निवडणुकीची धांदल सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणांगणात टिकण्यासाठी पक्षांकडून तसेच उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर्‍हेतर्‍हेची आश्वासने उमेदवारांकडून दिली जात आहे. यातील काही अजब आश्वासने तर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. असेच काहीसे अजब आश्वासन वंचित बहुजन आघाडीकडून माढा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रमेश बारस्कर यांनी दिले आहे. मी निवडून आलो तर तरुणांची लग्ने लावून देणार आश्वासन करत तरुणांचे लक्ष खेचून घेण्याचा चांगलाच प्रयत्न या उमेदवाराने केला आहे.

राज्यात महत्त्वाचे अनेक प्रश्न समोर असताना वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवाराने मात्र या सर्व प्रश्नांना बगल देत थेट तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयालाच हात घातला आहे. बारस्कर म्हणाले, तरुणांचे लग्न करणे हा माझ्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक चांगल्या तरुणांना आज मुली मिळत नाहीत. मी निवडून आलो तर तरुणांची लग्ने करून देईन, असे आश्वासन बारस्कर यांनी दिले आहे. सध्या त्यांच्या या आश्वासनाची तरुणाईत चांगलीच चर्चा सुरू आहे.

Back to top button