Nargis Antule Passed Away : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन | पुढारी

Nargis Antule Passed Away : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

रायगड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या श्रीमती नर्गिस अंतुले  यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले.  त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवारी  रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यांतील आंबेत या मूळगावी त्यांच्या निवासस्थान परिसरात करण्यात आला. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली तसेच त्यांचे जावई मुश्ताक अंतुले असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुतणे नविद अंतुले यांचे चार वर्षापूर्वीच निधन झाले. अंतुले यांच्या राजकारणात पत्नी नर्गिस यांनी मोठी साथ दिली होती.

स्व.बॅ.ए.आर.अंतूले यांचे तत्कालीन कट्टर समर्थक आणि पेणचे विद्यमान भाजपा आमदार रविद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काॅंग्रेसचे पदाधिकारी व मान्यवर अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित हाेत.

बॅरिस्टर अंतुले आणि नर्गिस यांचा १९५७ मध्ये विवाह झाला होता. जेव्हा बॅरिस्टर अंतुले पहिल्यांदा नर्गिस यांना भेटले, तेव्हा पहिल्या नजरेतच त्यांनी नर्गिस यांना प्रेमाचा होकार कळविला, त्यावेळी नर्गिस या केवळ १६ वर्षांच्या होत्या. त्यांनी पुढे ४ वर्षे वाट पाहिली. नर्गिस यांच्या वयाच्या २० वर्षी त्यांनी अरेंज मॅरेज पद्धतीने बॅरिस्टर अंतुले यांच्याशी विवाह केला. १९५७ पासून अंतुले यांच्या निधना   पर्यंत म्हणजेच २०१४ पर्यंत त्यांनी संसार केला. मुंबईतील चर्चगेट परिसरात त्यांचे वास्तव्य होते. नर्गिस यांना लिखाण आणि वाचनाची आवड होती.

Back to top button