Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य १८ ते २५ मार्च २०२४ | पुढारी

Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य १८ ते २५ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आठवडा अनुकूल आणि फलदायी आहे. मात्र आपण आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे श्रीगणेश सांगतात. नवीन नोकरीच्‍या प्रयत्‍नात असाल तर यश मिळेल. अनेक पर्यायांमुळे तुम्हाला योग्य निवड करणे आव्‍हानात्‍मक असेल. कामाच्या ठिकाणी तुम्‍ही मांडलेल्‍या कल्‍पनाची प्रशंसा होईल. प्रियजनांसोबत आठवडा आनंदात जाईल. या आठवड्यात बरेच काही शिकण्याची संधी मिळेल.

वृषभ : हा आठवडा तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल. तुम्ही आठवड्याची सुरुवात सकारात्मकतेने कराल. तुम्ही
तुमच्‍या आवडीला प्राधान्‍य द्‍याल. तुम्ही तुमचे नातेसंबंध जोपासत प्रियजनांना वेळ देऊ शकता, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचे व्यवस्थापन करण्याची अतिरिक्त काळजी घ्याल. मालमत्ता विक्री संदर्भात आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल.

मिथुन : या आठवड्यात तुम्ही तुमचे ध्‍येय साध्‍य कराल. आरोग्य उत्तम राहिल. पर्यटनाचे नियोजन करा. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. इतरांना आनंदी ठेवल्‍याने तुमचा मूड चांगला होईल. व्यावसायिक कामे पूर्ण करण्‍यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, असे श्रीगणेश सांगतात.

कर्क : श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात तुम्हाला पुरसतीचा वेळ मिळेल. अविवाहितांचे विवाह निश्‍चित होण्‍याचे योग आहेत. नवीन लोकांसह जुन्या मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करा. व्‍यवसायात प्रगती होईल. आरोग्‍य चांगले राहिल; पण या आठवड्याच्‍या सुरुवातीला खाण्याच्या सवयींबद्दल अधिक काळजी घ्‍या. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

सिंह : आपल्‍या कामात परिपूर्ण होण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळेल. व्यावसायिक आघाडीवर तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. तुम्हाला उत्साही आणि सकारात्मक वाटेल. तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कन्या : या आठवड्यात आरोग्याची काळजी घेण्‍यावर भर द्या. पोषणतज्ञांचा सल्ला घेणे योग्‍य ठरेल. तुम्ही भेटलेल्या प्रत्येकजण आनंदी होतील. भविष्यात मिळणार असलेल्‍या निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करा. यामुळे तुमच्या जीवनात लक्षणीय बदल घडणार आहेत.गुंतवणुकीसाठी हा उत्तम आठवडा आहे. महत्त्वाचे निर्णय घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात तुम्‍ही शिस्तप्रिय असाल. मात्र काहीतरी वाईट घडेल, अशी तणावाची भावनाही अनुभवाल. मात्र ग्रहमान अनुकूल आहे. तुमचे प्रियजन सुरक्षित आणि निरोगी असतील. सर्व सकारात्मक ऊर्जा तुमच्या आरोग्याचे रक्षण करत आहेत. जीवनशैलीत व्यायाम किंवा योगासनांचा समावेश करा.

वृश्चिक : या आठवड्यात सकारात्‍मक गोष्टींकडे लक्ष दिल्यास नकारात्मकतेचा त्रास होणार नाही. स्‍वत:ला अपडेट केल्याने भविष्यात खूप मदत होईल. जोडीदार आणि मुलांबद्दल काही मोठे निर्णय घ्याल. मुलांच्‍या मतांचा आदर करा. आरोग्यावर जास्त खर्च करण्यापेक्षा खाण्याच्या चांगल्या सवयी लावा. व्यायामाकडे दुर्लक्ष करु नका. नवीन संधी मिळत नसल्याच्या चिंतेत हा आठवडा वाया घालवू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

धनु – श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात प्रवास होईल. तुमचे सहकारी तुमच्या कलेचे कौतुक करतील. शारीरिक हालचालींवर भर दिल्‍यास तुमच्या मानसिक आरोग्य सुधारण्‍यास मदत होईल. नातेसंबंधाबाबात निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहिल.

मकर : या आठवड्यात अडचणी असूनही तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. सुट्टीत मित्रांसोबत वेळ व्‍यतित केल्‍याने उत्साह वाटेल. नवीन कल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न करू शकता. याचा तुम्हाला दीर्घकाळात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत समाधानाची भावना अनुभवाल. हा आठवडा तुमच्या व्यवसायासाठी दिलासादायक ठरेल, असे श्रीगणेश सांगतात.

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, नातेसंबंधासाठी हा आठवडा उत्तम ठरेल. व्यावसायिक जीवनात आव्हान अनुभवाल. मात्र यातूनच सर्वोत्तम साध्‍य करणे हेच लक्ष्‍य ठेवा. तुमचे धाडसी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व लोकांना प्रभावित करेल. काळजी करण्‍यापेक्षा तुमची उत्पादकता वाढवा. गोष्टी सुरळीत होतील.

मीन : श्रीगणेश सांगतात की, हा आठवडा तुमच्‍यासाठी सकारात्मक आहे. आराम करण्यासाठी वेळ काढा. तुमच्या व्यवसायासाठी तसेच तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी ते फायदेशीर ठरेल. जोडीदार कुटुंबातील इतर सदस्यांसोबतच्या वादात तुम्हाला खूप साथ देईल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक तसेच कामाच्या जीवनाचा आनंद घ्याल. सुट्टीच्या काळात शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा.

Back to top button