आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, ११ मार्च २०२४ | पुढारी

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, ११ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज प्रलंबित कामांना गती मिळेल. तुम्‍ही घेतलेले निर्णयही यशस्वी होतील, असे श्रीगणेश सांगतात. भावंडांशी संबंध ताणणे टाळा. नात्यात नकारात्मक गोष्टी आणणे योग्य नाही. गेल्या काही काळापासून व्‍यवसाय समोर असणारी समस्या सोडविण्‍याचा मार्ग मिळेल.

वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, तुम्‍ही तुमच्‍या कौशल्याच्‍या जोरावर यश मिळवाल. प्रतिस्पर्धी पराभूत होऊ शकतात. समाजात मान-सन्मान राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. अहंकारामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. पती-पत्नीमध्ये अहंकाराबाबत काही प्रकारचे वाद होऊ शकतात.

मिथुन: आजचा दिवस फलदायी राहील, असे श्रीगणेश सांगतात. आदर मिळविवण्‍यासाठी आदर करण्‍याचीही गरज आहे, याची जाणीव ठेवा. राजकारणाशी संबंधित लोकांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. आर्थिक व्‍यवहार विचारपूर्वक करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या त्रासदायक ठरू शकते.

कर्क : मागील काही दिवस तुम्‍ही करत असलेल्‍या परिश्रमाला यश मिळेल; पण कोणतेही काम करण्यापूर्वी सर्व पातळ्यांवर विचार करा. घर, वाहन इत्यादींशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. पती-पत्नी नात्यात सुसंवाद राहिल.

सिंह : गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या प्रश्‍नावर तोडगा निघाल्‍याने तुम्‍हाला दिलासा मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. कौटुंबिक आणि आर्थिक संबंधित महत्त्वपूर्ण निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील. दुपारनंतर ग्रहस्थिती अनुकूल राहील धीर धरा. अनावश्यक कामांवर लक्ष केंद्रित केल्याने तणाव निर्माण होईल. तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त रहा. नोकरीत तुमचा सन्मान राखता येईल.

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांतील सहभागामुळे सकारात्मक राहाल. आर्थिक गुंतवणुकीबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींना पैसे देऊ नका. गैरसमजांमुळेही संबंध खराब होऊ शकतात. वैवाहिक नात्यात वाद निर्माण होऊ शकतो.

तूळ: श्रीगणेश म्हणतात की, आज योग आणि ध्यान तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक परिणाम देऊ शकते. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. भावनिक होऊन तुमची कोणतीही महत्त्वाची गोष्ट कोणाच्याही समोर उघड करू नका. अन्यथा जवळची व्यक्तीच तुमचा विश्वासघात करू शकते. मुलांच्‍या समस्‍या सोडविण्‍याला
प्राधान्‍या द्‍या. अनुभवी व्‍यक्‍तीचा सल्ला व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : आज उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. आर्थिक स्थितीही चांगली राहील. मालमत्तेशी संबंधित प्रलंबित काम आज पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. धार्मिक आणि आध्यात्मिक संस्थांसाठी तुमचे विशेष योगदान असेल. अयोग्य काम तुम्हाला त्रास देऊ शकते याची जाणीव ठेवा. अतिकामामुळे वैयक्तिक आणि कौटुंबिक कामांकडे दुर्लक्ष होईल. व्यावसायिक कामांमध्ये अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

धनु : श्रीगणेश सांगतात की, काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येवर आराम मिळेल. वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. अप्रिय बातम्यामुळे तणाव वाढेल. ध्यान केल्‍यास सकारात्मकता येईल. विद्यार्थ्यांनी चुकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

मकर : श्रीगणेश म्‍हणतात की, तुमची कामे अत्यंत सकारात्मक पद्धतीने करा आजचा दिवस तुम्हाला यश देईल. रखडलेल्या कामाला गती येईल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित प्रकरण सहज सोडवता येईल. कोणाकडून जास्त मदतीची अपेक्षा करू नका; तुमच्या योग्यतेवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी बाहेरील व्यक्तीशी संवाद साधताना संयम राखण्याची गरज.

कुंभ : आज कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा स्नेह लाभेल, असे श्रीगणेश सांगतात. मागील काही काळापासून तुम्‍ही घेतलेल्‍या परिश्रमाचा फायदा मिळेल. धार्मिक नियोजनात सहभागी व्‍हाल. शेजाऱ्यांशी मतभेद टाळा. मोठा खर्च होऊ शकतो.

मीन : आज एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल. तुम्ही कोणताही निर्णय सहजपणे घेऊ शकाल. तरुणांना करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. जमिनीशी संबंधित कोणत्याही बाबतीत आज पैशाशी संबंधित व्यवहार टाळा, मुलांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

Back to top button