Benefits of Bananas | हिमोग्लोबिनची कमतरता असणार्‍यांनी केळी नियमित खावीत, जाणून घ्या फायदे | पुढारी

Benefits of Bananas | हिमोग्लोबिनची कमतरता असणार्‍यांनी केळी नियमित खावीत, जाणून घ्या फायदे

केळामध्ये भरपूर कॅल्शियम असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. हिमोग्लोबिनची कमतरता असणार्‍यांनी केळं नियमित खावं. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. (Benefits of Bananas)

संबंधित बातम्या 

शरीरातल्या आतड्यांची साफसफाई करण्याच्या कामी केळी उपयुक्त ठरतात. केळ्यात ग्लुकोज भरपूर असतं. तसंच पाणी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह खूप प्रमाणात असतं. शरीराला तत्काळ ऊर्जा प्रदान करण्यासाठी ते साहाय्यक ठरतं. पचनाशी निगडित त्रास असेल, तर नियमित केळं खाण्याचा फायदा होऊ शकतो. केळामधील फायबर घटक शौच साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता चार हात दूर राहण्यास मदत होते.

काहीजणी केळ्याचा वापर करून फेसपॅक तयार करतात. काहीजणी कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येवर सोपा उपाय म्हणून केळ्यापासून विशिष्ट मिश्रण तयार करतात. त्वचा टवटवीत व तजेलदार होण्यास आणि केसांना नवीन झळाळी मिळण्यास त्यामुळे साहाय्य मिळतं असं मानलं जातं. जुलाब होत असतील, तर ते थांबण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. त्यातच एक उपाय म्हणून केळ खायला सांगितलं जातं. लंघन करून दिवसातून दोन ते तीन वेळा अर्धं-अर्धं केळं खाल्ल्यास पोट लवकर दुरुस्त होण्याची शक्यता वाढते.

शरीरातली रक्ताभिसरण क्रिया सुरळीत राहण्यास, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास केळ हातभार लावतं. केळामधील घटक शरीराला ऊर्जा देतात. यात शर्करेचं प्रमाण खूप असतं. भरपूर कष्ट करणार्‍या मुली, तरुणी आणि महिलांनी दुधासोबत एक केळं खाल्ल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळणं शक्य होतं. (Benefits of Bananas)

Back to top button