banana : ...म्हणून केळी नसतात सरळ! | पुढारी

banana : ...म्हणून केळी नसतात सरळ!

नवी दिल्ली : आपण रोजच अनेक गोष्टी पाहात असतो. पण त्या तशाच का आहेत, याचा क्वचितच विचार करतो. केळी (banana) हे बारमाही उपलब्ध असणारे व अत्यंत पौष्टिक असे फळ आहे. या फळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही सरळ नसते तर थोडे वक्राकार असते. केळ असे वाकडे का असते याचा कधी विचार केला आहे का? त्यामागेही एक नैसर्गिक कारण आहे.

कोणत्याही झाडाला आधी फुले येतात व त्यामधूनच नंतर फळ विकसित होत असते. अर्थातच केळही (banana) याला अपवाद नाही. केळाचे फळ हे केळांच्या घडाच्या रूपाने विकसित होत असते. एका घडात अनेक केळी असतात व ती वरच्या दिशेनेच वाढत असतात. जेव्हा केळी आकाराने मोठी होतात, तेव्हा ‘निगेटिव्ह जियोट्रॉपिझम’ या प्रक्रियेतून त्यांची वाढ होते. ज्याचा अर्थ ते जमिनीच्या दिशेने न वाढता, सूर्यप्रकाशाच्या दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने वाढतात. त्यामुळे त्यांचा आकार वक्र किंवा वाकडा होतो. या कारणामुळेच केळ्यांचा आकार सरळ नसून वाकडा असतो.

Back to top button