Dolly Chaiwala : डॉली चहावाल्याची बिल गेट्सनंतर पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा | पुढारी

Dolly Chaiwala : डॉली चहावाल्याची बिल गेट्सनंतर पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध उद्योगपती गेट फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी नागपूरच्या प्रसिद्ध डॉली चहावालाच्या अफलातून स्टायलिश चहाचा आस्वाद घेतला आणि ते फोटो, व्हिडिओ बिल गेट्स यांनी शेअर करताच डॉली रातोरात सुपर सेलिब्रिटी झाला.लवकरच त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा पाजण्याचे स्वप्न आहे. अभिनेता रजनीकांत यांचा तो जबरदस्त फॅन असल्याने त्यांना देखील आपण चहा देणार असल्याचे तो आज म्हणाला. (Dolly Chaiwala)

बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत आणि या दौऱ्या दरम्यानच ‘डॉलीच्या चाय ‘ची बिल गेट यांचेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे नागपूरच्या IIM सोबतही बिल गेट्स फाउंडेशन काम करीत आहे. हे चित्रीकरण हैदराबादला झाले. आपल्याला बोलावण्यात आले,हॉटेलला थांबविण्यात आले, मी आपल्या टपरीवर गेलो, काही विदेशी पाहुणे आल्याचे कळले. मात्र, आपला चहा प्यायलेला हा माणूस इतका मोठा असल्याचे व्हिडिओ इन्स्टग्रामवर आल्यानंतरच कळल्याचे आज डॉलीने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. अतिशय संघर्षातून पुढे आलेला कधीकाळी सायकलने येणारा डॉली आज कारने मित्रमंडळी,भावासोबत पोहचला. जल्लोषात दुकानात स्वागत झाले नागपुरातील सिव्हिल लाईन्सस्थित जुन्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनसमोर जुन्या सचिवालयाच्या संरक्षक भिंतीला लागून डॉलीकडे दिवसभर अनेक लहान मोठ्या लोकांची ‘चाय पे चर्चा’ सुरू असते. चहा झाला की खास स्टाईलमध्ये डॉलीची सुटे पैसे परत करण्यासोबतच हातावर विलायचो ठेवण्याचा हजरबपणा बघितला की बडे बडे त्याच्या ,त्याच्या स्टाइलिश चहाच्या प्रेमात पडतात. याशिवाय परत जाताना एक झक्कास सेल्फी पण काढतात आणि अर्थातच डॉली क्षणभर व्यवसाय विसरून या आदरतिथ्यात सहभागी होतो. आधीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी ओळखला जाणारा सेलिब्रिटी डॉली आता सुपर, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी झालाय, लवकरच त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा पाजण्याचे देखील स्वप्न पूर्ण व्हावे हीच सदिच्छा.

हेही वाचा

Back to top button