जरांगे-पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल | पुढारी

जरांगे-पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : मराठा नेते मनोज जरांगे हे उपचारासाठी सोमवारी (दि. २६) सांयकाळी छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले. १७ दिवस उपोषण केल्याने त्यांना अशक्तपणा आहे. रुग्णालयात दाखल होताच त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली, डॉक्टरांची टिम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे आणि सगेसोयरे कायदा लागू करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठीच गेल्या १७ दिवसांपासून अंतरवाली सराटी गावात त्यांचे उपोषण सुरु होते. सोमवारी त्यांनी आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. तसेच डॉक्टरांच्या सल्यानूसार पुढील उपचारासाठी सांयकाळी जरांगे रुग्णवाहिकेने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीची तपासणी केली. त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. तसेच रक्त आणि युरिनचे नुमने घेत तपासणीला पाठवण्यात आले. सलग १७ दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे यांना अशक्तपणा आलेला आहे. वजनही घटले आहे. त्यामुळे त्यांना सक्तीने आराम करण्याची गरज आहे. याशिवाय त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितले.

Back to top button