कणिकेत मिसळा हे पदार्थ पोळ्या होतील एकदम मऊ | पुढारी

कणिकेत मिसळा हे पदार्थ पोळ्या होतील एकदम मऊ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मऊसूत किंवा रेशमी चपात्या खायला कुणाला आवडत नाहीत ? विशेषत: गरम गरम चपात्या खाणं म्हणजे पर्वणीच असते. पण अशा चपात्या बनवणं हे कौशल्याचं काम आहे. चपाती बनवायला शिकताना वेगवेगळे नकाशे लाटण्यापासून ते गोल आणि टम्म फुगलेली चपाती बनवण्याच्या या प्रवासात काही सोप्या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील. यासाठी कणिक मळण्यापासूनच काळजी घेणं गरजेच आहे. कणिक मळताना पिठासोबत पुरेसे पाणी, तेल यांचं मिश्रण असणं महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? कणीक मळताना त्यात पुरेसे दही घातल्यास चपात्या मऊ होण्यास मदत होते. दहयामध्ये असलेले प्रोबायोटिक्स गव्हाच्या पीठातील ग्लुटेनची परिणामकारकता वाढवण्यास मदत करते. यामुळे चपाती जास्त काळ मऊ राहण्यास मदत होते.

दही किती प्रमाणात घ्यावे :

साधारण दीड कप पिठासाठी 2 चमचे दही असं प्रमाण घ्यावे.

एक लक्षात घ्या कि दही मिसळल्यानंतर नेहमीपेक्षा कणीक मळताना पाण्याचे प्रमाण कमी लागते. त्यामुळे मर्यादित पाणी वापरावे नाहीतर कणिक पातळ किंवा जास्त सैल होण्याची शक्यता असते. हळू हळू आणि हलक्या हाताने पाणी मिसळावे.

दही कसे असावे :

कणिक मळताना दही हे ताजे वापरावे.

ते आंबट नसावे.

तवा योग्य प्रकारे गरम केलेला असावा.

याशिवाय कणिक मळताना अतिथंड पाण्याचा वापर करणं टाळाव.

Back to top button