Maratha Reservation Protest : धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी जाहीर | पुढारी

Maratha Reservation Protest : धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी जाहीर

धाराशिव ; पुढारी वृत्‍तसेवा धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी उग्र आंदोलने होत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी रात्री उशिरा हे आदेश जारी केले. पुढील आदेशापर्यंत आता जिल्ह्यात कोणालाही पाच पेक्षा अधिक या संख्येने फिरता येणार नाही. संचारबंदीच्या आदेशामुळे मराठा आंदोलन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

एकुणच काल (सोमवार) मराठा आंदोलनाने उग्र रूप धारण केल्‍याचे समोर आले. अनेक ठिकाणी आंदोलकांनी टायर पेटवून महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्‍न केला. अनेक ठिकाणी एसटी बसेसही फोडण्यात आल्‍या. तर अनेक नेत्‍यांनाही या आंदोलनाची झळ बसली. दरम्‍यान मनोज जरांगे-पाटील यांनी सायंकाळी मराठा आंदोलन शांततेत करण्याचे सर्वांना आवाहन केले. तसेच जाळपोळ आणि उग्र आंदोलन कोणीही करू नये नाहीतर मला वेगळा निर्णय घ्‍यावा लागेल असे ते म्‍हणाले. तसेच जरांगे यांनी या घटनांमागे सरकारचा हात असण्याची शक्‍यताही वर्तवली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उपाेषण साेडणार नसल्‍याची भूमिका त्‍यांनी जाहीर केली आहे.

हेही वाचा :

Back to top button