Israel-Hamas War : गाझामध्ये युद्धविराम नाही, त्याचा अर्थ हमासला ‘शरणागती’ होईल : बेंजामिन नेतन्याहू | पुढारी

Israel-Hamas War : गाझामध्ये युद्धविराम नाही, त्याचा अर्थ हमासला 'शरणागती' होईल : बेंजामिन नेतन्याहू

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्यात आतापर्यंत नऊ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धबंदीबाबत इस्रायलची भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेच्या ९/११ हल्ल्यासारखे युद्धविराम मान्य करणार नाही, कारण त्याचा अर्थ हमास समोर ‘शरणागती’ होईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

सोमवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला युद्धबंदीबाबत इस्रायलची भूमिका स्पष्ट करायची आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात इस्रायल युद्धविराम जाहीर करू शकत नाही. युद्धविरामचे आवाहन करणे म्हणजे इस्रायलसाठी हमासला शरण जाण्यासारखे आहे. हे दहशतीला शरण येण्यासारखे आहे. बायबल म्हणते की हा शांतीचा काळ आहे आणि युद्धाचाही काळ आहे.

नेतन्याहू पुढे म्हणाले की, आता लोकांनी ठरवण्याची वेळ आली आहे की, ते भविष्यासाठी लढायला तयार आहेत की, अत्याचार आणि दहशतवादाला शरण जायचे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने जे केले ते आम्हाला आठवण करून देते की आम्ही लढल्याशिवाय आम्ही चांगले भविष्य वाचवू शकणार नाही. इस्रायलने युद्ध सुरू केले नाही. आम्हाला युद्ध नकोच आहे. पण आता हे युद्ध आम्ही जिंकूच, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

 

Back to top button