अळूची भाजी : चवदार आणि पौष्टिक – मराठी रेसिपी | पुढारी

अळूची भाजी : चवदार आणि पौष्टिक - मराठी रेसिपी

आपल्या आजूबाजूला आता इतर राज्यातील आणि परदेशातील विविध खाद्यपदार्थांची गर्दी झालेली आहे. पिज्झा, बर्गर असे परदेशी पदार्थ तर बटर चिकन, दालमखनी असे उत्तर भारतीय तर इडली, डोसा असे दाक्षिणात्य पदार्थ आता पावलोपावली मिळतात. पण कधीतरी या पदार्थांचाही कंटाळ येतो, अशा वेळी आपल्याला हवी असते अस्सल मराठमोठी रेसिपी.

आज आपण आळूची भाजी कशी करायची ती पाहाणार आहोत. अळूची पाने बाजारात सहज मिळतात. अळूच्या वड्या अनेकांना आवडीच्या असतात, पण याच अळूची अगदी छान आणि कमी वेळात भाजीही बनवता येते. ही भाजी पौष्टिक तर असतेच आणि चवदारही असते. नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ आला असेल तर ही भाजी एकदा नक्की बनवा.

Recipe By सोनाली जाधव

Course: मेनकोर्स Cusine: महाराष्ट्रीय Difficulty: :

Servings

5 minutes

Preparing Time

15 minutes

Cooking Time

20 minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. दोन लहान जुड्या अळूची पाने

  2. अर्धा गड्डा चुका

  3. एक लहान मुळा

  4. भिजवलेला हरभरा आणि शेंगदाणे पाव वाटी

  5. थोडे काजू

  6. हिरव्या मिरच्या

  7. सुक्या खोबऱ्याचे काप

  8. मेथीचे दाने

  9. गोडा मसाला पाव चमचा

  10. तेल

  11. डाळीचे पीठ

  12. फोडणीचे साहित्य

DIRECTION

  1. अळूची पाने आणि चुका चिरून कुकरमध्ये शिजवून घ्या.

  2. मुळ्याच्या लहान चकत्या करा.

  3. मुळ्याच्या चकत्या, डाळ, दाने, मिरचीचे तुकडे, खोबऱ्याचे काप एकत्र करून शिजवा.

  4. डाळीचे पीठी घालून भाजी घोटून घ्यावी.

  5. फोडणीमध्ये ही भाजी घालावी.

  6. त्यात शिजवलेली डाळ, दाणे, खोबऱ्याचे काप, काजू मिक्स करावेत.

  7. त्यात चिंचेचा कोळ, गूळ, मसाला, मीठ आणि आवश्यक तेवढे पाणी घालून उकळी आणावी.

NOTES

    याही रेसिपी ट्राय करा

    Back to top button