Chandrayan 3 : चंद्रावर कंपने! ILSA कडून पहिल्या नैसर्गिक घटनेची नोंद; रंभाने दिली प्लाझ्मा विषयी महत्वाची माहिती; ISRO ची माहिती | पुढारी

Chandrayan 3 : चंद्रावर कंपने! ILSA कडून पहिल्या नैसर्गिक घटनेची नोंद; रंभाने दिली प्लाझ्मा विषयी महत्वाची माहिती; ISRO ची माहिती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chandrayan 3 : भारताची चांद्रयान 3 मोहीम कमालीची यशस्वी ठरत आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दररोज नवनवीन माहितीचे अपडेट पाठवत आहे. तर आता विक्रम लँडरमधील अन्य उपकरण (ILSA) ने 26 ऑगस्टला चंद्रावरील कंपनांची  नोंद केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर घडलेल्या या नैसर्गिक घटनेची पहिल्यांदाच नोंद केली आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

विक्रम लँडरमध्ये वेगवेगळी उपकरणे आहेत. त्यामध्ये लँडरमधील उपकरण चंद्रावरील कंपन तरंगाच्या हालचाली मोजणारे एक उपकरण आहे ज्याचे नाव Instrument of Lunar Seismic Activity (ILSA- इन्स्ट्रूमेंट्स ऑफ लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी) असे आहे. या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर घडलेल्या पहिल्या नैसर्गिक घटनेची नोंद केली आहे, असे इस्रोने सांगितले आहे. मात्र, याचा स्रोत अद्याप तपासला जात आहे, असेही इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ने गुरुवारी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Chandrayan 3 : एमईएमएसचे हे पहिलेच उदाहरण

इस्रोने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, चांद्रयान 3 लँडरवरील इन्स्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोड हे चंद्रावरील मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीम्स (एमईएमएस) तंत्रज्ञानावर आधारित उपकरणाचे पहिले उदाहरण आहे. यात रोव्हर आणि इतर पेलोड्सच्या हालचालींमुळे होणार्‍या कंपनांची नोंद करण्यात आली आहे, असे इस्रोने सांगितले.

ILSA पेलोड LEOS, बंगळूर येथे डिझाइन केले आहे आणि साकारले आहे. उपयोजन यंत्रणा URSC, बेंगळुरूने विकसित केली आहे.

Chandrayan 3 : चंद्रावर प्लाझ्मा कमी; भविष्यातील मोहिमांसाठी महत्वाची माहिती

चंद्रावर विक्रम या लँडरवर बसवण्यात आलेल्या रंभा-एलपी या उपकरणाने दक्षिण ध्रुवावर प्लाझमाची उपस्थिती तुलनेने कमी असल्याचे नोंदवले आहे. इस्रोने गुरुवारी याबाबत प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. या माहितीच्या आणि चाचणी डेटाच्या आधारे, भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी अधिक चांगली उपकरणे आणि दळणवळण प्रणाली तयार करण्यात मदत होऊ शकते.

ISRO ने माहिती दिली की ‘रेडिओ अॅनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फीअर अँड अॅटमॉस्फियर-लँगमुइर प्रोब’ (रंभा-एलपी) ने दक्षिण ध्रुवाच्या चंद्राच्या पृष्ठभागावर पहिली चाचणी घेतली. या चाचणीत असे दिसून आले की पृष्ठभागाजवळील प्लाझमाचे प्रमाण खूपच कमी आहे. ही माहिती रेडिओ लहरींवर आधारित संप्रेषण प्रणालीमध्ये मदत करू शकते. भविष्यातील चंद्र प्रवाशांसाठी उत्तम डिझाइन उपकरणे बनवण्यातही ही माहिती खूप उपयुक्त ठरणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे. रंभा-एलपी हे तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या स्पेस फिजिक्स प्रयोगशाळेने विकसित केले आहे.

ISRO च्या या माहितीमुळे विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर, इल्सा (ILSA) आणि रंभा LP ही विक्रम लँडरवरील अन्य उपकरणेही चोख कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा :

Back to top button