बंगळूर; वृत्तसंस्था : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाबाबत धक्कादायक नोंदी करणार्या चांद्रयानाच्या रोव्हरने केलेल्या चाचण्यांत तेथे गंधक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे समोर आणले आहे. चंद्राच्या भूमीवर पाय ठेवल्यापासून सहा दिवसांत रोव्हरने महत्त्वाची माहिती पाठवली असून वैज्ञानिक त्याचा अभ्यास करीत आहेत. (Chandrayan 3])
चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरलेल्या विक्रम लँडरमधील रोव्हरने आपले काम सुरू केले आहे. त्याच्या हातात सूर्यप्रकाशाचे अवघे 14 दिवस असल्याने त्याच्या कामाचा वेग वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी रोव्हरने तापमानाबाबत नोंदी पाठवत चंद्राच्या पृष्ठभागावर उणे 10 अंश ते 60 अंश तापमान असल्याची महत्त्वाची माहिती पाठवली होती. त्याचे विश्लेषण करण्यात शास्त्रज्ञ गुंतले असताना आता नवीन माहिती समोर आली आहे. (Chandrayan 3)
रोव्हरवर बसवलेल्या लेझरयुक्त स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून चंद्रावर कोणते रासायनिक घटक आहेत याचा शोध घेतला आहे. त्यात चंद्रावर गंधक उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरणांच्या मदतीने हा अभ्यास करण्यात येत आहे. अपेक्षेनुसार चंद्रावर अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटानियम, सिलिकॉन, मँगेनिज आणि ऑक्सिजन असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. हायड्रोजनचा शोध सुरू आहे, असे इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा;