Pune Crime : पूर्ववैमनस्यातून तलवार आणि दगडाने ठेचून एकाचा खून  | पुढारी

Pune Crime : पूर्ववैमनस्यातून तलवार आणि दगडाने ठेचून एकाचा खून 

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पुण्यात पूर्ववैमनस्यातून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१५) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास मंगला टॉकीज समोर घडली. नितीन मोहन म्हस्के, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

Pune Crime : पूर्ववैमनस्यातून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मोहन म्हस्के हा तरुण चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी टोळक्याने तलवार आणि दगडाने त्याचा ठेचून खून केला आहे. आरोपीचे सागर उर्फ येल्ल्या असे नाव आहे. आरोपी सागर याच्यावर पूर्वी कोरेगाव पार्क पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा 

Back to top button