iPhone 15 सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; जाणून घ्या काय आहेत खास फिचर्स | पुढारी

iPhone 15 सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; जाणून घ्या काय आहेत खास फिचर्स

पुढारी ऑनलाईन : आयफोन-१५ (iPhone 15) सीरिज लवकरच बाजारात येत आहे. पुढच्या महिन्यात १२ किंवा १३ सप्टेंबर रोजी ॲपलच्या कॅलिफोर्निया मुख्यालयात ही सीरिज लॉन्च होणार आहे. तसेच २२ सप्टेंबरच्या आसपास हा iPhone 15 विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती ॲपलने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून दिली आहे.

iPhone 15 : ‘हे’ आहेत खास फिचर्स

आगामी iPhone 15 या मालिकेत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max हे विविध मॉडेल्स असणार आहेत, असेही ॲपल ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच आयफोनचे हे नवीन मॉडेलमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. ज्यामध्ये क्वालकॉम मॉडेम चिप्स, ॲडवान्स 3-नैनोमीटर A17 चिप्स, पेरिस्कोप लेंस-एन्हांस्ड झूम, यूएसबी-सी पोर्ट, नॉच-फ्री इमर्शन तसेच टायटॅनियम फ्रेम्ससह अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह हा स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे.

 iPhone 15 ची किंमत किती असणार?

भारतात ॲपलच्या नवीन मालिकेतील  iPhone 15 ची किंमत रु. ७७,९९० असणार आहे. यामध्ये iPhone 15 च्या या मूळ मॉडेलमध्ये ८ गीगाबाइट्स RAM आणि 256 gigabytes इटरनल स्टोरेज असणार आहे. iPhone 15 Pro ची किंमत 1,39,900 रुपयांपासून सुरू होऊ शकते, जी आयफोन 14 प्रो लॉन्च किंमतीपेक्षा 10,000 रुपये जास्त आहे. त्याचप्रमाणे, iPhone 15 Pro Max ची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरू होऊ शकते, जी 14 प्रो मॅक्सच्या लॉन्च किंमतीपेक्षा 20,000 रुपये जास्त आहे. ॲपलचे हे नवीन मॉडेल काळ्या आणि सोनेरी रंगांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Back to top button