Moharam Tajia : ताजियामध्ये हाय टेंशन तारेमुळे स्फोट; ४ ठार; ९ जण जखमी | पुढारी

Moharam Tajia : ताजियामध्ये हाय टेंशन तारेमुळे स्फोट; ४ ठार; ९ जण जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Moharam Tajia : झारखंडमधील बोकारो येथे ताजिया नेत असताना हाय टेंशन तारेमुळे स्फोट होऊन यामध्ये ४ जण ठार झाले आहे. तर ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी 6 वाजता घडली. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

झारखंडच्या बोकारो येथे आज शनिवारी साळी मोहरमचा जुलूस काढण्यात आला होता. या दरम्यान तिथे ही दुर्घटना घडली. या ११००० व्होल्टच्या हाय टेंशन तारेच्या स्फोटात १३ जण होरपळले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. मोहरम ताजिया घेऊन जाताना ही दुर्घटना घडली. Moharam Tajia

घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की ताजिया उठवताना वरतून जाणाऱ्या ११ हजार व्होल्टच्या हाय टेंशन तार ताजियाच्या सेटमध्ये गेली. त्यामुळे ताजियाच्या जुलूस मध्ये ठेवलेल्या बॅट्रीचा स्फोट झाला. स्फोटामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. घटनेतून सावरल्यावर सर्व जखमींना तात्काळ डीवीसी बोकारो येथील थर्मल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने देखील थोडा वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा :

अहमदनगरमध्ये मोहरमसाठी 1100 पोलिसांचा बंदोबस्त

मोहरमनिमित्त उद्या वाहतुकीत बदल

Back to top button