PM Narendra Modi:’गीता प्रेस’ कोट्यवधी लोकांसाठी जिवंत श्रद्धेचे केंद्र : पीएम मोदी | पुढारी

PM Narendra Modi:'गीता प्रेस' कोट्यवधी लोकांसाठी जिवंत श्रद्धेचे केंद्र : पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन: ‘गीता प्रेस’ आणि त्याचे कार्यालय हे केवळ मुद्रणालय नाही, तर कोट्यवधी लोकांसाठी एका मंदिराप्रमाणे आहे. हे ठिकाण म्हणजे केवळ एक प्रेससंस्था नसून जिवंत श्रद्धेचे केंद्र आहे, असे गौरोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याला आज (दि.७ जून) संबोधित करताना ते (PM Narendra Modi) बोलत होते.

पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘गीता प्रेस’ भारतीय संस्कृती आणि वारसा जतन करणारे जीवंत श्रद्धेचे केंद्र आहे. जिथे गीता आहे तिथे कृष्ण आहे. जिथे कृष्ण आहे तिथे करुणा आणि कर्म आहे. ज्ञानाची अनुभूती आणि विज्ञानाचे संशोधनही येथेच आहे, असे देखील ते (PM Narendra Modi) म्हणाले.

१९२३ मध्ये गीता प्रेसच्या रूपाने येथे जो अध्यात्मिक प्रकाश पडला, त्याचा प्रकाश आज संपूर्ण मानवतेला दिशा देत आहे. आपण सर्वजण या मानवतावादी मिशनच्या सुवर्ण शतकाचे साक्षीदार आहोत हे आपले भाग्य आहे. गीता प्रेससारखी संस्था केवळ धर्म कार्याशी निगडित नसून, तिचे राष्ट्रीय चारित्र्यही आहे. गीता प्रेस भारताला जोडते, भारताची एकता मजबूत करते. त्याचमुळे आमच्या सरकारने गीता प्रेसला यंदाचा गांधी शांतता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला, असेही पीएम मोदी (PM Narendra Modi) यांनी स्पष्ट केले आहे.

PM Narendra Modi: ‘गीता प्रेस’ला २०२१ चा ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर

गोरखपूर येथील गीता प्रेसला २०२१ चा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा १९ जून, २०२३ रोजी संस्कृती मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंडाळाकडून ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भातील माहिती मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून (Gandhi Peace Prize-2021) दिली होती.

हेही वाचा:

Back to top button