Fly Dubai Flight Fire: काठमांडू येथून दुबईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला आग, सुरक्षित लँडिंग | पुढारी

 Fly Dubai Flight Fire: काठमांडू येथून दुबईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला आग, सुरक्षित लँडिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाल मध्ये सोमवारी (दि.२४) काठमांडू विमानतळावरून  दुबईला निघालेल्या विमानात  इंजिनात आग लागली. त्या नंतर विमानाच सुरक्षित रित्या लॅंडिग करण्यात आले. नेपाल नागरिक उड्डाण प्राधिकरणाने सांगितल की, फ्लाईट ५७६ (बोईंग ७३७-८००) सुरक्षितरित्या उतरले. हे विमान आता काठमांडूहून दुबईला जाण्यासाठी पुढे जात आहे. काठमांडू विमानतळाचे कामकाज आता पूर्वपदावर आले आहे. नेपालचे पर्य़टन मंत्री यांच्या माहितनूसार काठमांडू ते दुबईला  जाणाऱ्या या  विमानात  एकुण १२० नेपाली नागरिक आणि ४९ विदोशी नागरिक होते.  ( Fly Dubai Flight Fire )

एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, काठमांडूहून दुबईला जाणारी फ्लाय दुबई फ्लाइट 576 काठमांडूहून उड्डाण करत असताना पक्ष्याला धडकली. मानक प्रक्रियेचे पालन करून, दुबईला जाणारी फ्लाइट नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि स्थानिक वेळेनुसार 00:१४ वाजता पोहोचेल.

 Fly Dubai Flight Fire : जानेवारी महिन्यात मोठा अपघात 

काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर १५ जानेवारी महिन्यात मोठा अपघात झाला होता.  हे विमान लागला होता. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर 15 जानेवारी रोजी पोखराजवळ यति एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. यात  ७२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

हेही वाचा-

Back to top button