Urinate in Flight : धक्कादायक! विमानात पुन्हा एकदा सहप्रवाशावर लघुशंका, अमेरिकन एयरलाइन्समधील प्रकार | पुढारी

 Urinate in Flight : धक्कादायक! विमानात पुन्हा एकदा सहप्रवाशावर लघुशंका, अमेरिकन एयरलाइन्समधील प्रकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूयॉर्क-नवी दिल्ली अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या सहकारी प्रवाशावर लघुशंका केली.  सूत्रांनी रविवारी (दि.५) ही माहिती दिली. माहितीनूसार ही घटना AA२९२ या विमानात  घडली आहे. हे विमान न्युयॉर्कहून शुक्रवारी रात्री ९.१६ उड्डाण केल. १४ तास २६ मिनीटे उ़ड्डाणानंतर शनिवारी  रात्री १० वाजून १२ वाजता हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरले. ( Urinate in Flight)

विमानतळावरील सुत्रांच्या माहितीनूसार आपल्या सहकारी प्रवाशावर लघुशंका करणारा आरोपी हा अमेरिकन विद्यापीठाचा विद्य़ार्थी आहे. विद्य़ार्थ्याने माफी मागितलल्यानंतर पिडित पुरुषांने पोलिसांकडे तक्रार करण्यास इच्छूक नव्हता. कारण आरोपी विद्यार्थ्याचे करियर गुन्हा दाखल केल्यानंतर धोक्यात येवू शकते. पण हे प्रकरण एयरलाइनने गांभीर्याने घेत  आयजीआय विमानतळावर एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला कळवले आहे. विमानातील क्रूला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली ज्याने एटीसीला ही बाब कळवली, त्यांनी सीआयएसएफ कर्मचार्‍यांच्या सहकर्याने  आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.

 Urinate in Flight : काय सांगतो नागरी विमान वाहतूक नियम

नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, जर एखादा प्रवासी अनियंत्रित वर्तनासाठी दोषी आढळला, तर त्याला/तिला गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई व्यतिरिक्त, गुन्ह्याच्या पातळीनुसार विशिष्ट कालावधीसाठी उड्डाण करण्यास बंदी घालण्यात येईल. मद्यधुंद अवस्थेत प्रवाशाने सहप्रवाशासोबत असे वर्तन केल्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

गेल्या काही महिन्यांतील दुसरी घटना

गेल्या काही महिन्यांतील  अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे ज्यामध्ये एका प्रवाश्याने मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर लघुशंका केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी, न्यूयॉर्क-दिल्ली एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये जवळपास अशीच घटना घडली होती. या प्रकरणात  शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने एका वृद्ध महिलेवर मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केली होती. ही घटना जवळपास एक महिन्यानंतर मीडिया रिपोर्टद्वारे उघडकीस आली, त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आणि मिश्राला अटक करण्यात आली. जवळपास महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

हेही वाचा 

Back to top button