Taiwan Discount For Travellers : ‘हा’ देश फिरण्यासाठी देणार चक्क १३ ते ५४ हजार रुपयांचा प्रवासी भत्ता | पुढारी

Taiwan Discount For Travellers : ‘हा’ देश फिरण्यासाठी देणार चक्क १३ ते ५४ हजार रुपयांचा प्रवासी भत्ता

तैपई; पुढारी ऑनलाईन : कोविडमुळे प्रभावीत झालेल्या टुरिझम इंडस्ट्रीला सावरण्यासाठी तसेच त्याला आणखी गती देण्यासाठी तैवान देशाने अनोखी कल्पना शोधली आहे. टुरिझमला बुस्ट करण्यासाठी त्यांनी एक योजना आखली आहे. या योजनेतंर्गत तैवानकडून फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना आर्थिक मदत केली जाणार आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे व पर्यटन व्यवसायाला पाठबळ देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. (Taiwan Discount For Travellers)

सीएनएनच्या बातमी नुसार अलिकडेच तैवान सरकारने या योजनेतंर्गत पाच लाख पर्यटकांना वैयक्तीकरीत्या १३ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत प्रवास करताना राहण्याची सोय, प्रवासाची सोय आणि इतर गोष्टींसाठी हे पैसे खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहेत. तसेच या योजनेतंर्गत वैयक्तीकरित्या सोडून ९० हजार टूर ग्रुप्सना ५४ हजार ५०० रुपयांपर्यंतचा पर्यटन भत्ता सरकार देणार आहे. हा भत्ता पर्यटकांना डिजीटल स्वरुपात दिला जाईल. ज्याचा वापर प्रवासासाठी, राहण्यासाठी व प्रवासासंबधातील इतर खर्चांसाठी करता येईल. (Taiwan Discount For Travellers)

या योजनेबाबत अधिक माहिती देताना तैवानचे ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन मंत्रालयाचे प्रवक्त्याने सांगितले की, येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना रोलआउट प्लॅनसह या ऑफरचा लाभ घेण्याची संधी मिळेल. तैवान सरकार लकी ड्रॉ किंवा एअरलाइन्सद्वारे लोकांना ही ऑफर जारी करू शकते. पर्यटकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा निवास, वाहतूक किंवा इतर खरेदीवर सवलत म्हणून पैसे दिले जाऊ शकतात. तैवानने आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी ५.३ अब्ज तैवान डॉलर्सची योजना तयार केली आहे. (Taiwan Discount For Travellers)

या योजनेत, टूर एजन्सीला किमान आठ पर्यटकांच्या गटासाठी १० हजार तैवान डॉलर्स आणि किमान १५ पर्यटकांच्या गटासाठी २० हजार तैवान डॉलर्सची योजना समाविष्ट करण्यास सांगितले आहे. तैवानने या महिन्यात हाँगकाँग आणि मकाऊ येथून पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. यावर्षी ६० लाख पर्यटकांना आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

अधिक वाचा :

Back to top button