पुढारी ऑनलाइन डेस्क : आतापर्यंत अनेक वेळा एखादा प्रवासी चुकून दुस-या बसमध्ये किंवा रेल्वेत चढला असे ऐकले पाहिले आहे. मात्र, एक प्रवासी चक्क चुकीच्या फ्लाइटमधून दुस-याच ठिकाणी पोहोचला असे क्वचितच घडते. मात्र, Indigo च्या फ्लाइटमध्ये, असे घडले आहे. 30 जानेवारीला एका प्रवाशाला Indigo च्या फ्लाइटने दिल्ली टू पटनाला जायचे होते. मात्र, तो चुकीच्या फ्लाइटमध्ये चढला आणि उदयपूरला पोहोचला. या घटनेमुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. कारण विमानाने प्रवास करताना प्रवासी चुकीच्या फ्लाइटमध्ये जाऊ नये यासाठी मोठ्या तपासणी प्रक्रियेतून जावे लागते. अफसर हुसेन असे या प्रवाशाचे नाव आहे. नेमके कोणत्या चुकीमुळे हा प्रवासी चुकीच्या फ्लाइटमध्ये चढला. वाचा सविस्तर…
अफसर हुसेन याला 30 जानेवारीला दिल्लीवरून पटनाला जायचे होते. मात्र, तो चुकीच्या फ्लाइटमध्ये चढला आणि उदयपूरला पोहोचला. विशेष म्हणजे विमानतळावरील आणि नंतर IndiGo प्लाइटमध्येही हे कोणाच्याही लक्षात आले नाही. या घटनेमुळे किशोर कुमार यांच्या जाना था जपान पहुंच गए चीन या गाण्याची आठवण जागी झाली.
अफसर हुसेन हा 30 जानेवारीला दिल्ली विमानतळावरून टर्मिनल 1 वरून IndiGo 6 E-214 मधून पटना येथे जाणार होता. "या फ्लाइटसाठी बोर्डिंग हे एरोब्रिजवरून आणि डब्यांमधून नव्हते. तो उजव्या गेटवर होता; त्याचे कार्ड स्कॅन केले आणि नंतर कोचमध्ये चढण्यासाठी टर्मिनल बिल्डिंगमधून बाहेर पडले जे त्याला रिमोट स्टँडवर घेऊन जाणार होते जेथे फ्लाइट 6E-214 उड्डाणासाठी उभी होती," असे ओळखीच्या लोकांनी सांगितले.
नेमका येथेच सगळा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. र्मिनल इमारतीतून बाहेर पडल्यावर, हुसैन अनवधानाने IndiGo 6E-319 वर उदयपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी असलेल्या कोचमध्ये चढला. विमानाच्या उताराच्या पायथ्याशी होणारे यांत्रिक स्टब-रिटेन्शनमुळे हुसेन चुकीच्या फ्लाइटमध्ये चढला होता हे ओळखू शकले नाही. उदयपूरसाठी अंतर आणि उड्डाणाच्या वेळेबाबत इनफ्लाईट घोषणा केल्या जात असताना आपण चुकीच्या विमानात असल्याचेही प्रवाशाला लक्षात आले नाही. हुसैनचे बोर्डिंग कार्ड पटना फ्लाइटसाठी स्कॅन केले गेले होते. जेव्हा इंडिगोने त्याचा शोध सुरू केला होता तेव्हा हे अद्याप तेथे उपस्थित नाही, अशी त्यांना माहिती मिळाली.
हुसैन जेव्हा उदयपूरला पोहोचला तेव्हा आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबत IndiGo ला याची माहिती देण्यात आली. ही चूक लक्षात आल्यानंतर इंडिगो ने त्या प्रवाशाला त्याच दिवशी दिल्लीला पुन्हा आणले आणि नंतर 31 जानेवारीला पटना येथे सोडले.
याबाबत IndiGo इंडिगोने आपल्या निवेदनात घटनेवर स्पष्टीकरण दिले. "6E319 दिल्ली-उदयपूर फ्लाइटमध्ये प्रवाशासोबत घडलेल्या घटनेची आम्हाला माहिती आहे. आम्ही या प्रकरणी अधिका-यांशी चर्चा करत आहोत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत."
या प्रकरणी सर्व एअरलाइन्सचे अधिकारी आश्चर्यचकित आहे. कारण बस, ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेप्रमाणे विमानाचा प्रवास नसतो. विमानतळावर अनेक तपासण्या केल्या जातात. जेव्हा प्रवासी कोच किंवा एरोब्रिजने विमानाकडे जातात तेव्हा बोर्डिंग कार्ड टर्मिनलवर स्कॅन केले जातात. जेव्हा कोच प्रवाशांना विमानात घेऊन जातो, तेव्हा बोर्डिंगच्या वेळी बोर्डिंग कार्ड रॅम्पवर पुन्हा तपासले जाते. एवढ्या प्रक्रिया असूनही हुसैनबाबत चूक कशी झाली हे अधिकारी तपासत आहेत.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणी एअरलाइनकडून अहवाल मागवला असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यासाठी इंडिगोवर IndiGo "योग्य कारवाई" केली जाईल.
हे ही वाचा :