IND vs NZ 1st T20: भारताच्या सलामी जोडीमध्ये होणार बदल; पंड्याने दिले संकेत | पुढारी

IND vs NZ 1st T20: भारताच्या सलामी जोडीमध्ये होणार बदल; पंड्याने दिले संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलँड बरोबर सुरू होणाऱ्या टी २० सामन्यांसाठी IND vs NZ 1st T20 भारताच्या टीममध्ये काही बदल होण्याचे संकेत कर्णधार हार्दिक पंड्याने दिले आहेत. न्यूझीलँड बरोबर सुरू असणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये काही खेळाडूंनी त्यांची वेगळी चमक दाखवली असून एकंदरीतच संघाची कामगिरी चांगली दिसून आली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी टी २० सामन्यांसाठी सलामीच्या जोडीमध्ये बदल होण्याचे संकेत पंड्याने आज पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहेत.

पंड्याने यावेळी सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धच्या T20I (IND vs NZ 1st T20) मालिकेत फॉर्मात असलेला सलामीवीर शुभमन गिलला पृथ्वी शॉपेक्षा प्राधान्य दिले जाईल. गिलचा वनडेतील उत्कृष्ट फॉर्म पाहता त्याची निवड निश्चित असल्याचे हार्दिकने सांगितले. गिलने गेल्या चार सामन्यांमध्ये द्विशतकासह तीन शतके झळकावली आहेत. गिल आणि ईशान किशन डावाची सुरुवात करतील, असेही त्याने यावेळी सांगितले.

Shubman Gill Interview : वडिलांचे टोमणे ऐकल्यामुळे शुभमन गिलकडून शतकांचा पाऊस

दरम्यान, सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनी आणि पंड्याच्या भेटीबद्दल फोटो व्हायरल झाले होते. याबद्दल बोलताना तो म्हणाला, धोनीच्या भेटीमध्ये एक ऊर्जा असते, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत असतं आणि अशा भेटींमध्ये खेळाव्यातीरिक्त जीवनाबद्दल आम्ही जास्त बोलतो. IND vs NZ 1st T20

हे ही नक्की वाचा 

Back to top button