शुभमन गिलचे रेकॉर्ड ब्रेक द्विशतक, ईशान किशनला टाकले मागे | पुढारी

शुभमन गिलचे रेकॉर्ड ब्रेक द्विशतक, ईशान किशनला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : shubman gill record break double century : न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धु धु धुलाई करत भारताचा सलामीवीर शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याच्या या धमाकेदार खेळीने इतिहास रचला आहे. गिलने 149 चेंडूत 208 धावांच्या तुफानी खेळीत 19 चौकार आणि 9 षटकारांची आतषबाजी केली. याचबरोबर गिल हा न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

गिलने ईशानचा विक्रम मोडला

सलामीवीर शुभमन गिल किवींविरुद्धच्या पहिल्या वन-डेसाठी मैदानात उतरला त्याचे वय 23 वर्ष 132 दिवस होते. वयाच्या या टप्प्यावर द्विशतक झळकावून त्याने भारताच्याच इशान किशनचा विक्रमही मोडीत काढला आहे. डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज इशानने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध चट्टोग्राम येथे द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याचे वय 24 वर्षे 145 दिवस होते. गिलने अवघ्या 40 दिवसांत इशानला मागे टाकून सर्वात कमी वयात द्विशतक झळकावण्याची किमया केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 2013 वयाच्या 26 वर्षे 186 दिवसांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.

शुभमन गिलची सरासरी इशान किशनपेक्षा दुप्पट

गिलने आतापर्यंत 68.87 च्या सरासरीने 1102 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या 208 धावा वगळता या भारतीय सलामीवीराने उर्वरित 18 डावांमध्ये 59.6 च्या सरासरीने 894 धावा केल्या आहेत. जे इशान किशनच्या जवळपास दुप्पट आहे.

गिल 19 डावात 3 वेळा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला

शुबमन गिल 19 डावांमध्ये तीन वेळा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. 9, 7, 33, 64, 43, 98 नाबाद, 82 नाबाद, 33, 130, 3, 28, 49, 50, 45 नाबाद, 13, 70, 21, 116, 208 असे त्यांच्या खेळींचे प्रदर्शन आहे. तर दुसरीकडे इशान किशनच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

तो 59, 1, 28, 6, 50, 20, 93, 10, 210, 5 यामध्ये सलग दोन वेळा एकदाही 50 पेक्षा जास्त धावांचा आकडा पार केलेला नाही. एवढेच नाही तर तो एकदाही नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला नाही.

Back to top button