PM Modi : आपण गॅझेटचे गुलाम का व्हावे? पीएम नरेंद्र मोदी यांचा भारतीयांना सवाल | पुढारी

PM Modi : आपण गॅझेटचे गुलाम का व्हावे? पीएम नरेंद्र मोदी यांचा भारतीयांना सवाल

पुढारी ऑनलाईन: सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लहानांपासून वयोवृद्ध भारतीयांपर्यंत स्क्रिनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतीय लोक सरासरी दररोजचे ६ तास स्क्रीनवर घालवतात; ही त्या व्यक्तीच्या आणि देशाच्या दृष्टीनेही चिंतेची बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर आपण गॅझेटचे गुलाम का व्हावे? असा प्रश्नही मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.

दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाध साधला. स्क्रिनवर बोलताना पीएम मोदी म्हणाले, देवाने आपल्याला स्वतंत्र्य अस्तित्व आणि अपार क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व दिले आहे. मग आपण या गॅझेटचे गुलाम का व्हावे? असा प्रश्न त्यांनी यावेळी भारतीयांना विचारला.

देशातील लोक आज सरासरी ६ तास स्क्रीनवर घालवत आहेत. यामध्ये विनाकारण कोणत्याही उत्पादक क्षमतेशिवाय वेळ आणि उर्जा वाया जात आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे. यामुळे लोकांच्या सर्जनशीलतेलाही धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, एकदा का तुम्ही स्वत:ला तंत्रज्ञानाच्या गैरवापरातून बाहेर काढले तर, तुम्हाला प्रचंड आनंद मिळेल. त्याच क्षणी तुम्हाला खरे स्वातंत्र्य अनुभवता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button