Pariksha Pe Charcha 2022: परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होण्याची संधी; वाचा सहभागी होण्यासाठी काय करावे | पुढारी

Pariksha Pe Charcha 2022: परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होण्याची संधी; वाचा सहभागी होण्यासाठी काय करावे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा – ६ या कार्यक्रमांतर्गत नववी ते बारावी चे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसोबत नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडीयम येथे जानेवारी २०२३ मध्ये संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक यांची सहभागी म्हणून नोंदणी करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन ( Pariksha Pe Charcha 2022) करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळा, अनुदानित शाळा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा, व राज्यातील इतर बोर्डाशी सलग्न असलेल्या शाळांतील अधिकाधिक सहभाग वाढवा यासाठी विद्या परिषदेने आवाहन केले आहे. ३० डिसेंबर पर्यंत या कार्यक्रमात ऑनलाईन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची व निवड होण्याची संधी असणार आहे.ff://ळपपेंरीशळपवळर. पूर्सी .ळप / लि- २०२३ / वर विविध विषयांवर ऑनलाईन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील २०५० विजेत्यांना प्रमाणपत्र तसेच पंतप्रधानांनी लिहिलेले परीक्षा (Pariksha Pe Charcha 2022) योद्धा हे पुस्तक देण्यात येणार आहे. विद्यार्थी परीक्षा पे चर्चा ६ – कार्यक्रमासाठी आपले प्रश्न तयार करतील व त्यातील काही निवड केलेले प्रश्न सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष घेतले जाऊ शकतात. निबंध लेखन स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची व निवड होण्याची संधी वरील वेबसाईट वर उपलब्ध आहे.

हेही वाचा

Back to top button