Deepak kesarkar: ‘ज्यांनी खोके घेतले ते तुरूंगात…’ केसरकरांचा राऊतांवर पलटवार | पुढारी

Deepak kesarkar: 'ज्यांनी खोके घेतले ते तुरूंगात...' केसरकरांचा राऊतांवर पलटवार

पुढारी ऑनलाईन: ‘ज्यांनी खोके घेतले ते तुरूंगात जाऊन आले,’ असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ता आणि शालेय शिंक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. ५० खोक्यांसाठी एसआयटी स्थापन करा या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मंत्री केसरकर यांनी त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

ते पुढे म्हणाले, ज्यांनी खोके घेतले त्यांनाच खोक्याचे महत्त्व असते. खोके काढायचे असतील तर ज्याचे काढायचे आहेत त्याचे काढले जातील, असेही ते म्हणाले. आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत. चार-चार वेळा निवडून आलेले आमदार पैशासाठी फुटतील का? असा प्रश्न देखील केसरकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच विनाकारण लोकं दुखावली जातील, असे बोलू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ठाकरे आणि गटाला का लागतं ते काही कळत नाही? आम्ही ठाकरेंचं नाव घेतलं आहे का? न्याय दिशा सालियन हिला द्यायचा आहे पण ही गोष्ट यांना का लागते? एसआयटी या केसमध्ये तपास करेल आणि कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल, असे देखील केसरकर म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button